ताजी बातमी ऑनलाईन टीम
एलआयसीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असते. डोळे झाकून एलआयसीमध्ये गुंतवणूक करा असे म्हटले जाते. कराण एसआयलीच्या प्रत्येक योजनेवर नागरिकांना भरोसा असतो. म्हणजेत फसवणुक होण्याची चिंता दूर होते. एलआयसी देखील ग्राहकांचा विश्वास कायम जिंकण्यासाठी नवनवीन योजना मार्केटमध्ये आणत. पण आज आपण एलआयसीच्या अशा पॉलिसीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही दरमहा 36000 रुपये कमवू शकता. एलआयसी या पॉलिसीद्वारे गुंतवणूकदारांना दरमहा कमाई करण्याची संधीही देत आहे. याशिवाय जीवनाची सुरक्षा आणि रुपयाची गॅरंटी देखील कंपनीकडून मिळते.
एलआयसी जीवन अक्षय पॉलिसी असे या एलआयसीच्या पॉलिसीचे नाव आहे. एलआयसी ही पॉलिसी कंपनी पुन्हा एकदा सुरू करत आहे. या पॉलिसीअंतर्गत तुम्ही फक्त एक हप्ता भरून आयुष्यभर कमाई करू शकता. जीवन अक्षय पॉलिसी ही एक सिंगल प्रीमियम नॉन लिंक्ड नॉन-पार्टिसिपटिंग आणि पर्सनल एन्युटी प्लान आहे.
जर तुम्हाला काही पैशांची गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये पेन्शन मिळण्याचा पर्याय देखील आहे. जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे असतील तर तुम्ही इतर पर्याय निवडू शकता. फक्त 1 लाख रुपये गुंतवूनही तुम्ही दरमहा पैसे कमवू शकता. 1 लाख गुंतवल्यावर तुम्हाला दरवर्षी 12,000 रुपये मिळतील. सध्या या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.



