मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून इतिहास रचला आहे. इंग्लंड दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा विजेता ठरला आहे. इंग्लंडने एक षटक राखून हा सामना जिंकला आहे. याआधी 2010 मध्ये ब्रिटिश संघाने टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2019 मध्ये या इंग्लंडने 50 षटकांचाही विश्वचषक जिंकला होता. सध्या दोन्ही विश्वचषकाचं विजेतेपद इंग्लंडकडे आहे.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलता आणि पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केले. सुरुवातीला फलंदाजी करताला पाकिस्तानला निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या बदल्यात केवळ 137 धावांपर्यंत मजल मारता आली. यानतंर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडलापहिल्याच षटकात पहिला झटका बसला. त्यानतंर तिसऱ्या षटकात इंग्लंडची आणखी एक विकेट गेली. मात्र त्यानंतर बेन स्टोक्स आणि ब्रुकने इंग्लंडचा खेळ सावरला.
बेन स्टोक्स आणि मोईन अलीने संघाला विजयापर्यंत नेऊन पोहोचवले. संपूर्ण डावात बेन स्टोक्सने सावध खेळी करत संघाला स्कोअरबोर्ड हलता ठेवला. इंग्लंडने 45 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेन स्टोक्सने विजयाची जबाबादारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अर्धशतकी खेळी खेळत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
इंग्लंडने 5 विकेटने जिकंला सामना, दुसऱ्यांदा पटकावले टी-20 विश्वचषकाचे जेतेपद
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -