भारत टी-20 वर्ल्डकप संपल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा, के. एल. राहूल, विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 मालिका उद्या (ता. 18 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. तर 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय (वनडे) मालिका खेळवली जाणार आहे. हे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहेत.
भारत-न्यूझीलंड टी-20 व एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक:
पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता – (वेलिंग्टन)
▪️ दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (माउंट मौनगानुई)
▪️ तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (नेपियर)
▪️ पहिली वनडे: 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 वाजता (ऑकलंड)
▪️ दुसरी वनडे: 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 वाजता – (हॅमिल्टन)
▪️ तिसरी वनडे: 30 नोव्हेंबर 2022, सकाळी 7:00 वाजता – (ख्रिस्टचर्च)
संभाव्य भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक (हा संभाव्य संघ असून यात बदल होऊ शकतो.)
संभाव्य न्यूझीलंड संघ:
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरेल मिशेल, ॲडम मिल्न, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर. (हा संभाव्य संघ असून यात बदल होऊ शकतो.)