Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरमहाराष्ट्र गारठला! कोल्हापूरचे तापमान किती ? वाचा सविस्तर

महाराष्ट्र गारठला! कोल्हापूरचे तापमान किती ? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात थंडीचं दणक्यात आगमन झालंय. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील तापमानाचा पारा कमालीचा घसरला असल्याचं पाहायला मिळालंय.

रविवारी तर मुंबईत तापमान 20 डिग्री सेल्सिअसपेक्षाही खाली गेलं होतं. तर उत्तर महाराष्ट्राती काही भागातील तापमान तर 10 डिग्री सेल्सिअसपेक्षाही खाली आलं.

रविवारी सांताक्रूझ वेधशाळेनं किमान 19.8 इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद केली. तर जळगावात सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं. जळगावात 8.5 डिग्री सेल्सिअस इतका पारा खाली घसरला होता.

आज कुठे किती तापमान? (सकाळी 9 वाजेपर्यंत)

नागपूर – 17
मुंबई – 23
पुणे – 17
औरंगाबाद – 16
सातारा – 17
कोल्हापूर – 17
सोलापूर – 18
चंद्रपूर – 18
ठाणे- 22
नवी मुंबई – 21
रायगड – 18
नाशिक – 16
जळगाव – 17
धुळे – 19
अहमदनगर -12

महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंडीमुळे धुक्याची चादर पसरलीय. कोल्हापूर, सातारासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र थंडीने कुडकुडलाय. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील पारा घसरलाय. थंडीचा कडाका वाढल्यानं लोकांनी शेकोटीचा आधार घेतलाय.

फक्त मुंबई आणि जळगावच नव्हे तर औरंगाबाद आणि पुण्यातही थंडीने लोकं कुडकुडली आहेत. औरंगाबादमध्ये तापमान 9.2 तर पुण्यात 9.7 डिग्री सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली.

नाशिकमध्ये तापमानात सलग पाचव्या दिवशी तापमानात घट झालीय. रविवारी नाशिकमध्ये 9.8 इतकं तापमान नाशिकमध्ये नोंदवलं गेलं. हे आतापर्यंतच निच्चांकी तापमान आहे. दरम्यान, शनिवारी नाशिकमध्ये 10.4 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली.

गेल्या पाच दिवसात नाशिकमधील पारा 5.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची घट नोंदवली गेलीय. दरम्यान, इकडे मुंबईत दुसऱ्यांनी निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. याआधी 6 नोव्हेंबर रोजी 19.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -