Monday, August 4, 2025
Homeतंत्रज्ञानआता एटीएम कार्डशिवाय करा यूपीआय पेमेंट, फॉलो करा ‘या’ स्टेप्स..

आता एटीएम कार्डशिवाय करा यूपीआय पेमेंट, फॉलो करा ‘या’ स्टेप्स..

यूपीआयद्वारे पैसे पाठवणे किंवा पैसे अकाउंटवर मिळवण्यासाठी आपण फोनपे किंवा गुगलपे, पेटीएमसारख्या ॲप्सचा सर्वाधिक वापर करतो. पैशांच्या ऑनलाईन व्यवहारासाठी हे पेमेंट ॲप्स खूपच लोकप्रिय आहेत. देशातील लाखो लोक फोनपे ॲपचा उपयोग करत असतात. फोनपे ने आपल्या यूजर्ससाठी खास बातमी आणली आहे.

देशातील लाखो युजर्स कंपनीकडे असताना अजूनही अनेक नवीन युजर्स जोडण्यासाठी कंपनीचा प्रयत्न आहे. फोनपे च्या माध्यमातून लोकांना पैसे पाठवणे व मिळवणे सोपे होणारच आहे परंतु ज्या युजर्सकडे एटीएम कार्ड नसेल अशा या नवीन यूजरला फोन पे वर यूपीआय पेमेंट करावयाचे असल्यास त्यांना आता एटीएम कार्ड नसेल तर दुसरा पर्याय हाताळून यूपीआय ॲक्टीव्हेट करता येणार आहे.

जर तुम्ही फोन पे वर नवीन युजर असाल आणि जर तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तर तुम्हाला आता तुमच्या आधार कार्डच्या मदतीने यूपीआय ॲक्टीव्हेट करता येणार आहे. यासाठी तुमच्या आधार कार्ड च्या शेवटच्या फक्त सहा अंकांची मदत लागेल. यूपीआय ॲक्टीव्हेट करण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील त्या जाणून घ्या.

▪️ फोनपे अ‍ॅप ओपन करा
▪️ प्रोफाइल पेज पर्यायावर जा.
▪️ पेमेंट इंस्ट्रूमेंट टॅबवर क्लिक करा.
▪️ अ‍ॅड बँक अकाउंट पर्याय निवडा, त्यातील तुमच्या बँकचा पर्याय निवडा.
▪️ व्हेरिफाय पर्यायावर क्लिक करा, ओटीपी सबमिट करा.
▪️ युपीआय सेटअप सेक्शनमध्ये जा.
▪️ आधार कार्ड पर्यायावर क्लिक करा.
▪️ आधार कार्ड नंबरमधील शेवटचे सहा अंक टाका.
▪️ पुन्हा ओटीपी सबमिट करा, तुमची युपीआय सेटअप प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -