भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या बाईक-कार प्रेमामुळे नेहमी चर्चेत असतो. आता धोनीने एक इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे जी तब्बल 528 किमी मायलेज देतेय, असा कंपनीने दावा केला आहे. धोनीच्या या कारची राईड ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव यांनीही घेतली.
आता आपल्याला वाटत असेल की अशी कोणती कार आहे जी एवढी मोठी रेंज देऊ शकते. तर महेंद्रसिंह धोनीने घेतलेली ही कार किया कंपनीची असून ती अलीकडेच कंपनीने भारतात लॉंच केली आहे. Kia EV6 असं तिचं नाव आहे. किया मोटर्सने भारतामध्ये सध्या कंप्लीट बिल्ट युनिटद्वारे 200 युनिट्स सादर केले होते ते संपूर्ण विकले गेले आहेत. आता कंपनी अधिक युनिट्स आणणार आहे.
किया ईव्ही-6 बद्दल थोडक्यात…
किया ईव्ही-6 या इलेक्ट्रिक कारचे कंपनीने 2 मॉडेल लॉंच केले आहेत. पहिल्या मॉडेलची किंमत 59.95 लाख रुपये असून दुसऱ्या मॉडेलची किंमत 64.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
कंपनीने Kia EV6 मध्ये 77.4 kWh चा बॅटरी पॅक दिला असून ती एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 528 किमी धावू शकते. ही इलेक्ट्रिक क्रॉसओवर 350 kW DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करता येईल. Kia EV6 फक्त 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते, असा कंपनीने दावा केला आहे.
धोनीच्या ताफ्यात आता ही किया ईव्ही-6 सोबतच मर्सिडीज-बेंझ जीएलई, लँड रोव्हर 3, ऑडी क्यू7, जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक सारख्या कार्स आणि यामाहा RD350, हार्ले-डेव्हीसन फॅटबॉय बीएसए गोल्डस्टार, कावासाकी निंजा ZX14R आणि कावासाकी निंजा H2, कंफीडरेट हेलकॅट X32 अशा बाईक्सचे कलेक्शन आहे.