Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनअजय लवकरच करणार आणखी एक धमाका, 'Singham Again' च्या माध्यमातून करणार ॲक्शन

अजय लवकरच करणार आणखी एक धमाका, ‘Singham Again’ च्या माध्यमातून करणार ॲक्शन

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आणि दिग्दर्शकांची जोडी फारच प्रसिद्ध आहे. त्यातील एक जोडी म्हणजे अजय देवगण आणि रोहित शेट्टीची. या जोडीने आतापर्यंत अनेक चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.त्यातील एक चित्रपट म्हणजे सिंघम. सिंघम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा त्याच जोमात बॉक्स ऑफिसवर ही Rohit Sजोडी धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतंच चित्रपटाच्या आगामी भागाची घोषणा झाल्याची सध्या चर्चा होत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची अर्थात ‘सिंघम अगेन’ची घोषणा केली होती. आता या सिनेमाची रिलीज डेट ही समोर आली आहे. 2022 मध्ये अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली होती की, जवळपास महिनाभरानंतरही थिएटरमध्ये प्रेक्षकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर अजय देवगण त्याच्या दिग्दर्शनातील डेब्यू चित्रपट ‘भोला’मध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी 30 मार्चला रिलीज होणार आहे.

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ‘सिंघम अगेन’च्या रिलीज तारखेची माहिती दिली. हा चित्रपट दिवाळी 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे शूटिंग जुलै 2023 मध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाबाबत आणखी एक खास बाब समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण अजय देवगणच्या लेडी लव्हची भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘सिंघम’ फ्रँचायझी कॉप युनिव्हर्सचा एक भाग आहे. रोहित शेट्टीच्या गेल्या काही चित्रपटांप्रमाणेच कॅमिओ देखील ट्रेंडमध्ये आहेत. दीपिका पदुकोणने ‘सर्कस’मध्ये छोटी भूमिका केली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांचा कॅमिओ दिसणार असल्याची बातमी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -