Friday, February 7, 2025
Homeमनोरंजनसलमानचा 'किसी का भाई किसी की जान' तर समंथाचा 'शाकुंतलम'; एप्रिल महिन्यात...

सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ तर समंथाचा ‘शाकुंतलम’; एप्रिल महिन्यात रिलीज होणार

एप्रिल महिना सिप्रेक्षकांसाठी खूपच खास आहे. या महिन्यात अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. एप्रिलमध्ये रोमांच, थरार, नाट्य, अॅक्शन, देशभक्ती अशा वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यात सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमासह समंथा रुथ प्रभूच्या शाकुंतलम या सिनेमांचा समावेश आहे. 

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाचा ‘फुले’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा मुख्य भूमिकेत आहेत. प्रतीक महात्मा फुले यांच्या भूमिकेत तर पत्रलेखा सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 4 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

गुमराह’ या सिनेमात आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गुन्हेगारीवर बेतलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना चांगलच थ्रील पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. ‘थडम’ या तामिळ सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. येत्या 7 एप्रिलला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आदित्य दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

1974′ या सिनेमाचं कथानक स्वातंत्र्यापूर्वीचं आहे. या सिनेमाची गोष्ट एका छोट्या गावातील आहे. या सिनेमात गौतम कार्तिक मुख्य भूमिकेत आहे. 

सिनेमाचं नाव : छिपकली
कधी रिलीज होणार? 14 एप्रिल

‘छिपकली’ हा सिनेमा येत्या 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा विनोद घोसाल यांच्या छायाजपॉन या कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमात योगेश भारद्वाज, यशपाल शर्मा आणि तनिष्ठा विश्वास महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

सिनेमाचं नाव : शाकुंतलम

कधी रिलीज होणार? 14 एप्रिल

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. समंथाचा बहुचर्चित ‘शाकुंतलम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुनाशेखरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. समंथाचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

सिनेमाचं नाव : किसी का भाई किसी की जान
कधी रिलीज होणार? 21 एप्रिल

सलमान खानचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा येत्या 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. भाईजानच्या चाहते या सिनेमासाठी उत्सुक आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -