Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरदहा लाख भाविकांनी घेतलं ज्योतिबाचं दर्शन!

दहा लाख भाविकांनी घेतलं ज्योतिबाचं दर्शन!

गगनचुंबी शासन काट्या, पारंपारिक वाद्यांचा गजर, ज्योतिबाच्या नावाने चांगभलचा जयघोष, गुलालाची मनसोक्त उधळण अशा मोठ्या भक्तीमय वातावरणात वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबाची चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी राज्यातील सुमारे दहा लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले होते.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने ज्योतिबा डोंगरावर मंगळवारी रात्रीपर्यंत तीन लाख भाविक दाखल झाले होते. आज चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असल्याने ज्योतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. पहाटे पाच वाजता महाभिषेक, महापूजा, तर १० वाजता धुपारती सोहळा पार पडला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या वतीने तोफेची सलामी देण्यात आली .त्यानंतर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दिवसभर लाखो भाविक ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभा राहिले होते.

भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले होते. त्यामुळे भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेता आले. दिवसवर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. तर सायंकाळी हस्तनक्षत्रावर सांय ५.३० वाजता ज्योतिबाचा पालखी सोहळा पार पडला. यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर उधळण करण्यात आली.

पहाटे पाच वाजता ज्योतिबाचा शासकीय महाअभिषेक घालण्यात आला. यावेळी नाथांची महावस्त्र, अलंकारिक पूजा केली. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, जोतिबा मंदिरातील सर्व पुजारी आणि मानाच्या सासनकाठ्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान इनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा, त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे उर्फ सिंधिया सरकार, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली), रेठरे बुद्रुक साळुंखे (ता.कराड) यांच्या मानाच्या 18 सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी झालेल्या होत्या.

श्री यमाई म्हणजे रेणुका देवीचा विवाह सोहळा झाल्यानंतर नाथांची पालखी परत मंदिराकडे प्रस्थान करून प्रदक्षिणा घालून नाथांची पालखी सदरेवर विराजमान झाली यानंतर तोफेची सलामी होऊन यात्रेची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -