Friday, February 7, 2025
Homeअध्यात्मउद्या या मुहूर्तावर करा बजरंगबलीची पुजा, जाणून घ्या पुजा विधी

उद्या या मुहूर्तावर करा बजरंगबलीची पुजा, जाणून घ्या पुजा विधी

हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला होता.
यंदा हनुमान जयंती 6 एप्रिल रोजी साजरी होणार आहे. हनुमान जयंतीनिमीत्त हनुमानजींची विशेष पूजा करण्याची पद्धत आहे. असे केल्याने आपण आपल्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर करू शकतो. या दिवशी आपण विशेष प्रयोग करून ग्रहांना शांत करू शकतो. शिक्षण, विवाह, कर्जमुक्ती आणि खटल्यातील यशासाठी हा दिवस खूप खास आहे. चला जाणून घेऊया हनुमान जयंतीला हनुमानजींची पूजा करण्यासाठी कोणती सामग्री आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे.

हनुमान जयंतीच्या पुजेचे आवश्यक साहित्य

शेंदुर, लाल फुले, हार, जानवे, कलश, चमेलीचे तेल, लाल वस्त्र, गंगाजल, कंकू, कलश, अत्तर, मोहरीचे तेल, तूप, अगरबत्ती, दिवा, कापूर, तुळशीचे पान, पंचामृत, नारळ, पिवळे फूल, चंदन, लाल चंदन, फळे, केळी, बेसनाचे लाडू, प्रसादासाठी पेढे, हरभरा आणि गूळ, पान, पूजेचे ताट, अक्षत

हनुमान जयंती पूजा विधी

व्रताच्या एक रात्री आधी जमिनीवर झोपण्यापूर्वी प्रभू राम आणि माता सीता यांच्यासह हनुमानजींचे स्मरण करा. दुसऱ्या दिवशी लवकर उठून पुन्हा राम-सीता आणि हनुमानजींचे स्मरण करा. हनुमान जयंतीला सकाळी स्नान करून ध्यान केल्यानंतर हातात गंगाजल घेऊन व्रत करण्याचा संकल्प करा. यानंतर हनुमानजींची मूर्ती पूर्व दिशेला स्थापित करा. मनोभावे बजरंगबलीची प्रार्थना करा. यानंतर षोडशोपचार पद्धतीने श्री हनुमानजींची पूजा करावी.

हनुमान जयंती शुभ मुहूर्त

या वर्षी, चैत्र महिन्याची पौर्णिमा 05 एप्रिल रोजी सकाळी 09:19 वाजता सुरू होईल आणि 06 एप्रिल रोजी सकाळी 10:04 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, यावेळी हनुमान जयंती 06 एप्रिललाच साजरी केली जाईल.

हनुमान जयंती पुजन मुहूर्त

सकाळी 06:06 ते 07:40 पर्यंत
सकाळी 10:49 ते दुपारी 12:23 पर्यंत
दुपारी 12.23 ते 01.58
दुपारी 01:58 ते 03:32 पर्यंत
संध्याकाळी 05:07 ते 06:41 पर्यंत
संध्याकाळी 06.41 ते 08.07 वा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -