पती-पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला कोल्हापूर इचलकरंजी तसेच विशाळगड, गजापूर, केंबुर्णेवाडी, दिवाणबाग, बौध्दवाडी, भाततळी परिसरातील सर्वच सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. परिसरात वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी आणि त्याला सूत बांधण्यासाठी महिलांनी आज
सकाळपासूनच गर्दी केली होती.
आख्यायिकेनुसार, सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणून वटपौर्णिमा आधुनिक युगातही तितक्यात पारंपरिक पध्दतीने साजरी केली जात आहे. हिंदू धर्मातील सण, प्रथा, परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून आणि बुंध्याला सुताचे सात फेरे घालतात. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते. तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकतः दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे, हा त्यामागचा हेतू आहे. शनिवारी (दि. ३) रोजी सकाळपासूनच सुवासिनींमध्ये पूजेची लगबग सुरू झाली होती. साजशृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन परिसरातील महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. आंबे, केळी, फुले, हळद-कुंकू साहित्याने वडाची पूजा करत सुवासिनींनी जन्मोजन्मी हाच पती लाभो, अशी प्रार्थना केली, यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून आंब्याचे वाण दिले.
‘जन्मोजन्मी लाभो तुझी साथ ‘; इचलकरंजीत वटपौर्णिमा उत्साहात साजरी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -