Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगकेंद्र सरकारचा मोठा निर्णय, ICU साठी तयार केली नियमावली

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ICU साठी तयार केली नियमावली

 

 

आयसीयूमध्ये (Intensive Care Unit-ICU) उपचार घेणाऱ्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदाच नियमावली (Guidelines) जारी केली आहे. रुग्णाच्या गरजा पाहून रुग्णलयाला नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्रिटिकल केयर मेडिसीनमधील आघाडीच्या 24 तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलनं आयसीयूसाठी ही नियमावली तयार केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

24 जणांच्या पॅनेलने आयसीयूमधील वैद्यकीय स्थितींची यादी तयार केलीय, ज्यामध्ये रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवणे आवश्यक आहे. रुग्णाच्या चेतनाची बदलती पातळी किंवा रुग्णाला श्वास घेण्यास अडचण येत असेल, यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. कोणत्याही रूग्णासाठी गंभीर आजाराच्या बाबतीत देखील ICU काळजीची शिफारस करण्यात आली आहे.

 

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका रिपोर्ट्सनुसार, सर्जरीनंतर रुग्णांची प्रकृती भिगण्याची शक्यता अथवा सर्जरी अतिशय कठीण असल्यास आयसीयूमध्ये दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याशिवाय, ज्या रुग्णांना आयसीयूची विशेष गरज नाही किंवा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास विशेष वाव नाही अशा रुग्णांना या यादीतून बाहेर ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. आयसीयूसाठी नियमावली तयार करणाऱ्या एका तज्ज्ञानं सांगितले की, आयसीयू हे मर्यादित साधन आहे. या शिफारशींचा उद्देश त्याचा परिपूर्ण वापर सुनिश्चित करणे हा आहे. ज्या रुग्णांना आयसीयूची जास्त गरज आहे, त्यांना ती मिळावे, हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

 

दरम्यान, डॉक्टरांनी आयसीयूसाठी तयार केलेली नियमावली बंधनकारक नाही, फक्त मार्गदर्शनासाठी आहे. आयसीयू (ICU) मध्ये दाखल करणं आणि डिस्चार्ज करण्याचं निकष विस्तृत स्वरूपाचे आहेत. आयसीयूमध्ये कुणाला कधी, कितीवेळ ठेवायचं, हे बरेच काही उपचार करणार्‍या डॉक्टरांवर सोडण्यात आलेय. अनेक विकसित देशांमध्ये रूग्णांच्या चाचणीसाठी प्रोटोकॉल आहेत, जेणेकरुन उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा वापर केला जाऊ शकतो. भारतामध्ये फक्त एक लाख आयसीयू बेड्स आहेत. त्यामधील जास्तीत जास्त बेड्स हे खासगी वापरासाठी अथवा शहरात आहेत. खासगी रुग्णालये परवडत नसलेल्या गरीबांना आयसीयू बेड मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

 

या नियमावलीनुसार, रुग्णांना त्यांच्या आजाराच्या स्थितीनुसार ICU बेड्स प्राधान्य देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याशिवाय आपत्तकालीन स्थिती अथवा महामारीच्या काळात ही नियमावली फायदेशीर ठरु शकते. सध्या सरकारने सर्वांना गंभीर काळजी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशा सुविधा सुनिश्चित करण्याच्या दिशेने पाऊले उचलायला हवीत. खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड्सची किंमत इतर बेड्सच्या तुलनेत 5-10 पट जास्त आहे. याआधीही आयसीयूमध्ये विनाकारण रुग्ण दाखल होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -