वैयक्तिक कर्ज असो वा गृहकर्ज, सिबिल स्कोअरचा विचार करण्यात येतोच. जर सिबिल स्कोअर कमी असेल तर कर्ज देताना अडचणी येतात. बँका कर्ज देताना विचार करतात. छोटे-मोठे कर्ज घेताना बँका अगोदर सिबिल स्कोअरचा विचार करतात. पण केवळ कर्जच नाही तर आता काही नोकऱ्यांसाठी सिबिल स्कोअर महत्वाचा ठरत आहेत. आता तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण रोजगार मिळविण्यासाठी पण सिबिल स्कोअर महत्वाचा ठरला आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची क्रेडिट हिस्ट्रीची तपासणी करण्यात आली आहे. बँकांनी गेल्या वर्षभरात याविषयीची एक अधिसूचना काढली आहे. नोकरीसाठी हा एक आवश्यक निकष लावण्यात आला आहे.इमानदारीचे इनाम
कर्ज देताना बँका Cibil Score तपासतात. बँकेत कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी हा महत्वाचा निकष आहे. यापूर्वी ग्राहकाने कितीदा कर्ज घेतले आणि त्याची परतफेड कशी केली, याची माहिती त्यातून मिळते. सोप्या शब्दात तुम्ही कर्ज परतफेडीसाठी किती प्रामाणिक आहात, हे समोर येते. काही असाच प्रामाणिकपणा बँका नोकरी देताना उमेदवारांत शोधत आहेत. त्यासाठी बँकांना निकषात सिबिल स्कोअरचा रकाना जोडला आहे. बँकेतील नोकऱ्यांसाठी आता अनेक मोठ्या बँका आणि आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री चेक करत आहेत. उमेदवाराचा सिबिल स्कोअर 700 पाईंटसच्या वर असेल तर तो चांगला सिबिल स्कोअर मानण्यात येतो.असा ठरतो सिबिल स्कोअर
30% सिबिल स्कोअर हा तुम्ही नियमीत कर्ज चुकविता की नाही, यावर ठरतो. 25% सिबिल हे तुम्ही कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले आहे. सुरक्षित की असुरक्षित यावर ठरते. 25% क्रेडिट एक्सपोजर आणि 20% कर्ज हे वापरावर ठरते. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 या दरम्यान असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 वा त्यापेक्षा अधिक असेल तर तो चांगला मानण्यात येतो. 550 ते 750 या दरम्यानचा क्रेडिट स्कोअर हा मध्यम तर 300 ते 550 दरम्यानचा स्कोअर हा अत्यंत वाईट समजण्यात येतो.
असा होतो तयार सिबिल स्कोअर
क्रेडिट ब्युरो तुमचा क्रेडिट स्कोअर जारी करतात. यामध्ये ट्रांसयुनियन सिबिल, इक्विफेक्स, एक्सपेरियन आणि सीआरआयएफ हायमार्क यासारख्या क्रेडिटची माहिती देणाऱ्या कंपन्या प्रमुख आहेत. या कंपन्या ग्राहकांची आर्थिक माहिती गोळा करतात. त्यासाठीचा परवाना त्यांच्याकडे आहे. त्याआधारे क्रेडिट स्कोअर रिपोर्ट तयार करण्यात येतो. 24 महिन्यांच्या क्रेडिट हिस्ट्रीआधारे क्रेडिट स्कोअर तयार करण्यात येतो.
IBPS ने घेतला निर्णय
गेल्या वर्षी जुलै महिन्यात बँकिंग रिक्रुटमेंट एजेन्सी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन (IBPS) ने स्टेट बँक ऑफ इंडिया वगळल्यास इतर सरकारी बँकेत नोकरीसाठी सिबिल स्कओरचा निकष लावला होता. सिबिल स्कोअर अनिवार्य करण्यात आला आहे. बँकेत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा सिबिल स्कोअर 650 अंकापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. त्यामुळे या नोकरीसाठी अर्ज करताना क्रेडिट हिस्ट्री चांगली असणे आवश्यक आहे.