Wednesday, September 27, 2023
Homeकोल्हापूरहातकणंगले पोलिस ठाण्यासमोरच दोन गटात हाणामारी

हातकणंगले पोलिस ठाण्यासमोरच दोन गटात हाणामारी

ताज्या बातम्या ऑनलाइन टीम
हातकणंगले पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या रुकडी येथील एका समाजातील दोन गटातील जमावाची जमिनीच्या वादावरुन चक्क पोलिस ठाण्यासमोरच जोरदार हाणामारी झाली. यामध्ये महिला आणि पुरुषांचा ही समावेश होता. आरडाओरड, शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी चालु असलेली हाणामारी यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारास सिनेस्टाईलचे स्वरूप आले होते. मात्र इतरवेळी सर्वसामान्यांना गुरगुरणारे अधिकारी मुग गिळून गप्प का बसले होते

हेच लोकांना कळत नव्हते.
रुकडी येथील एका समाजातील दोन गटात जमिन व घराच्या मालकी हक्कावरून गेल्या बन्हयाच दिवसापासून वाद आहे. दोन महिन्यापुर्वी याच कारणावरून दोन गटात वादावादी होऊन सदरचे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत आले होते. मात्र पोलिसांनी ही भांडणे गांभिर्याने न घेता दोघांनाही ताकीद देऊन सोडून दिले होते. पोलिसांच्या …पान २ वर…

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र