Thursday, November 21, 2024
Homeआरोग्यविषयकखासगी आरोग्य विमा का काढावा? : Health Insurance

खासगी आरोग्य विमा का काढावा? : Health Insurance

मधुरा आणि गौतम, उच्चशिक्षित आणि चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला होते. साहजिकच, अनेक खासगी कंपन्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या इतर सुविधांबरोबरच त्यांना त्यांचा ‘ वैयक्तिक ग्रुप मेडिकल इन्शुरन्स ‘ मिळाला होता. तरुण वय आणि उत्तम आरोग्य यांमुळे त्यांना कंपनीतर्फे मिळणारे इन्शुरन्स कव्हर ‘ योग्य आणि पुरेसे ‘ आहे असे वाटत होते.Health Insurance

एक दिवस अचानक गौतमला पोटदुखी सुरू झाली. अनेक औषधे, डॉक्टरी उपाय करूनही काही केल्या गुण येत नव्हता. अखेर एका तज्ज्ञ डॉक्टरांनी पूर्ण तपासणी अंती पोटाचे एक ऑपरेशन करायला लागणार असल्याचे सांगितले. वेळीच ऑपरेशन निर्विघ्नपणे पार पडले पण यासाठी हॉस्पिटलचे bill मात्र इन्शुरन्स रकमेपेक्षा जास्त आले. साहजिकच वरची रक्कम गौरव आणि मधुराला स्वतः भरावी लागली.Health Insurance

मधुरा आणि गौतम सारखेच अनेकजण आज या विचार द्वंद्वात असतात की खरंच कंपनीचा ग्रुप मेडिकल इन्शुरन्स असताना, अजून एक खासगी स्वरूपाचा इन्शुरन्स घेऊन ‘ खर्च ‘ का वाढवावा?

खरंतर, खासगी हेल्थ इन्शुरन्स असणे केव्हाही चांगले.. कसे ते पाहू? Health Insurance

१. बदलत जाणारे नोकरीचे स्वरूप
आजकाल अनेक जण खासगी क्षेत्रात काम करतात. बहुतांश कंपन्या ‘ ग्रुप मेडिकल इन्शुरन्स ‘ देतात पण अजूनही काही लहान स्वरूपाच्या कंपन्यांमध्ये ही सुविधा असेलच असे नाही. शिवाय प्रत्येक कंपनीच्या नियम आणि अटींमध्ये फरक असतो, अंतर्गत होणारे आजार आणि सुविधा, इन्शुरन्स कव्हर, इत्यादींच्या तरतुदी वेगवेगळ्या असू शकतात.

Paytm पाठोपाठ आणखी एका App ला धक्का : बघा तुम्ही तर वापरत नाही ना ‘हे’ ॲप?

बरेचजण चांगला पगार , पद आणि काम यांसाठी नोकऱ्या बदलत राहतात आणि त्या प्रत्येक नवीन कंपनीनुसार हे नियम त्यांना लागू होतात. इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करता येऊ शकते पण अनेकदा हे माहिती असतेच असे नाही.

आपला खासगी इन्शुरन्स मात्र आपल्याबरोबर कायम राहू शकतो. त्यात काही कालावधी नंतर आपल्याला no claim बोनस इत्यादीचा फायदा ही मिळतो.Health Insurance

२. करिअर मधले बदल आणि हेल्थ इन्शुरन्स
आजकाल अनेक जण काही वर्षे नोकरी केल्यावर स्वतः चा व्यवसाय सुरू करतात. उत्पन्नाच्या अनिश्चिततेबरोबर व्यवसायामुळे त्यांचे ‘ कॉर्पोरेट ग्रुप मेडिकल इन्शुरन्स कव्हर ‘ सुद्धा जाते. अशावेळी मात्र त्यांना त्यांचा ‘ वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स ‘ बरोबर राहतो.

बजाज फायनान्स: 50 हजार रुपये Personal loan मिळवा! परतफेड ८ वर्षात करा !

३. वाढत्या वयानुसार बदलत जाणारे नियम आणि अटी
वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स घेताना आपले वय, आधीपासून असणारे आजार आणि शारीरिक व्याधी, इत्यादी वर आपल्याला लागू होणारे premium ठरते. याच बरोबर Co-Pay, no claim bonus, Waiting Period इत्यादी ठरते. याचा विचार करून वेळीच आपला ‘ वैयक्तिक हेल्थ insufance’ घेतलेला चांगला!

LIC Index Plus : LIC ने लाँच केला नवा इन्शुरन्स प्लॅन; जाणून घ्या काय आहे पॉलिसी आणि कसा होणार फायदा?

४. सर्व कुटुंबाचा समावेश एकाच पॉलिसीमध्ये
वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स घेताना आपण आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबातील इतर व्यक्ती जसं की पत्नी/ पती, मुले, आई वडील यांचा समावेश करून एक ‘ family floater’ पॉलिसी घेऊ शकतो. कॉर्पोरेट इन्शुरन्स कव्हर नेहमीच सर्वसमावेशक असेलच असे नाही.

फ्लिपकार्ट देईल 50 हजार रुपये पर्सनल लोन फक्त एक मिनिटात : Flipkart Personal Loan

‘ हेल्थ इन्शुरन्स ‘ मुळे आपल्यावर येणारा वैद्यकीय खर्चांचा अतिरिक्त भार हलका होण्यासाठी मदतच होते. त्यामुळे याकडे निव्वळ ‘ खर्च ‘ म्हणून न बघता ‘ खर्चाला हातभार ‘ या दृष्टीने पाहावे! Health Insurance

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -