Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगशेअर मार्केट म्हणजे काय?

शेअर मार्केट म्हणजे काय?

शेअर मार्केट म्हणजे काय” (What is share market in Marathi) आणि त्यात गुंतवणूक कशी करावी असा विचार तुम्ही कधी केला आहे का? जर होय, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आज या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

फिक्स डिपॉझिट, पोस्ट ऑफिस च्या विविध गुंतवणूक योजना इत्यादींसारख्या पारंपारिक गुंतवणूक पर्यायांमधून लोक शेअर बाजाराकडे वळत आहेत कारण शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा महागाईवर मात करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

 

आज, stock market मध्ये गुंतवणूक हा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जाऊ शकतो. कारण जर योग्य प्रकारे stock analysis करून गुंतवणूक केली तर कोणताही गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या मदतीने त्यांची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करू शकतो.शेअर मार्केट म्हणजे काय? (What is share market in Marathi)

शेअर मार्केट हे एक व्यासपीठ आहे जिथे खरेदीदार(buyer) आणि विक्रेते(seller) दिवसाच्या विशिष्ट तासांमध्ये सार्वजनिकरित्या सूचीबद्ध शेअर्सवर व्यापार करण्यासाठी एकत्र येतात.

 

लोक बर्‍याचदा ‘share market’ आणि ‘stock market’ हे शब्द परस्पर बदलून वापरतात. तथापि, दोघांमधील महत्त्वाचा फरक हा आहे की ‘शेअर मार्केट’ चा वापर केवळ शेअर्सच्या व्यापारासाठी केला जातो, परंतु ‘स्टॉक मार्केट’ विविध आर्थिक सिक्युरिटीज जसे की बाँड, डेरिव्हेटिव्ह्ज, फॉरेक्स इ मध्ये ट्रेड करण्यासाठी वापरला जातो.

 

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हे भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. स्टॉक एक्सचेंज म्हणजे ज्याठिकाणी stocks चे buy आणि sell चे transaction केले जाते ती जागा.

 

अर्थात, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काही physical जागा नसते. सर्व ट्रांसकशन हे online ब्रोकर च्या माध्यमातून होत असतात.

म्युच्युअल फंड हे व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेले फंड आहेत जे असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करतात आणि हे एकत्रित भांडवल विविध आर्थिक सिक्युरिटीजमध्ये जसे कि, इक्विटी, डेट किंवा बॉण्ड्स यासारख्या विविध आर्थिक साधनांमध्ये गुंतवतात.

 

आपल्यासारखे सामान्य लोक ज्यांना डायरेक्ट स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणे जमत नाही किंवा नोकरदार लोक ज्यांना स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ नसतो ते mutual fund मध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात.

 

डेरीवेटीव्ह(Derivatives)

 

“A derivative is a security that derives its value from an underlying security”. यामध्ये शेअर्स, बॉण्ड्स, चलन, कमोडिटीज यासारखे विविध प्रकार असू शकतात.

 

Derivatives हे गुंतवणुकीचा जास्त risk असलेला प्रकार मनाला जातो. डेरीवेटीव्हस trade करण्यासाठी technical analysis चे ज्ञान असणे फार महत्वाचे आहे.

 

स्टॉक मार्केट कसे कार्य करते?

एखादी कंपनी स्वतःला अनेक शेअर्समध्ये विभाजित करते आणि त्यातील काही शेअर्स लोकांना प्रति शेअरच्या किमतीने विकते.

ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, कंपनीला मार्केटप्लेसची आवश्यकता असते जिथे हे शेअर्स विकले जाऊ शकतात.

 

Stock market याच मार्केटप्लेसचे काम करते. याठिकाणी विविध कंपन्यांचे shares ट्रेडर्स द्वारा खरेदी आणि विक्री केले जातात. यासाठी SEBI ने निर्धार्रीत केलेले ब्रोकर्स प्लॅटफॉर्म द्वारे ऑनलाईन shares ची ट्रेडिंग केली जाते.

 

शेअर मूल्य वाढेल किंवा त्यांना लाभांश देयके(dividend) मिळतील किंवा दोन्ही मिळतील या अपेक्षेने गुंतवणूकदार कंपनीचे शेअर्स खरेदी करतात.

 

आणि त्यांनी ठरवलेले उद्दिष्ट साध्य झाल्यावर त्या shares ची विक्री करून नफा मिळवतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -