Tuesday, April 30, 2024
Homeकोल्हापूरहातकणंगलेत पुन्हा एकदा साखर कारखानदार – शेतकरी नेत्यात लढत

हातकणंगलेत पुन्हा एकदा साखर कारखानदार – शेतकरी नेत्यात लढत

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावर्षी पुन्हा एकदा साखर कारखानदार विरोधी ऊस उत्पादक आंदोलनाचे शेतकरी नेते असा रंग घेताना दिसत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना साखर कारखानदारांचे प्रतिनिधी ठरवून त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दंड थोपटले आहेत. मतदारसंघातील बहुतांशी साखर कारखानदारांचे पाठबळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सरूडकर यांच्या पाठीशी राहण्याची चिन्हे आहेत. या साखरपेरणीच्या राजनीतीवर राजू शेट्टी वारंवार विधाने करताना दिसू लागले असल्याने यंदा पुन्हा उसाच्या फडात निवडणुकीचे रण पेटताना दिसत आहे.

शेतकरी नेते आखाड्यात

हातकणंगलेत गेल्या चार लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेता हा महत्त्वाचा घटक बनलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या नेतृत्वाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. पैकी सलग दोन वेळा विजय मिळवला होता. गेल्यावेळी ते पराभूत झाले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा मांड ठोकली आहे. त्यांच्या बरोबरीने किसान नौजवान संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, जय शिवराय शेतकरी संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची भाषा करणारे माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांचे नारे थंडावले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावले कि या भागातील मतदार शेतकरी प्राधान्याने शेतकरी नेत्याच्या मागे राहतात हे शेट्टी यांनी दोनदा दाखवून दिले आहे. यामुळे अन्य शेतकरी नेत्यांनी यावेळी आखाड्यात उडी घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -