Thursday, May 16, 2024
Homeब्रेकिंगतुम्हीही ATM कार्ड वापरताना ही चूक करताय? पडेल महागात

तुम्हीही ATM कार्ड वापरताना ही चूक करताय? पडेल महागात

 

बँकिंगमधील (Banking Services) सर्वच गोष्टी आता डिजिटल (Digital Banking) झाल्या आहेत. असं असलं तरी रोख रक्कम हवी (Cash Withdrawn) असल्यास म्हणजेच पैसे काढण्यासाठी (Cash Withdrawal) आजही लोकांना रोख रक्कम हवी असल्यास बँकेत (Bank) जावे लागते. एटीएममध्ये जाऊनही सहज पैसे काढता येतात. आजकाल जेव्हा जेव्हा पैशाची गरज भासते. त्यामुळे अनेकदा आपण एटीएम कार्ड (ATM Card) वापरून पैसे काढतो. पण एटीएम कार्ड (ATM Card) वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा, एका चुकीमुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. (ATM Card Safety Tips)एटीएम कार्ड वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा ( ATM Card Safety Tips )

 

 

बहुतेक लोक पैसे काढण्यासाठी एटीएमचा सर्रास वापर करतात. मात्र, एटीएम मशीनमधून पैसे काढताना तुम्ही काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एटीएम कार्डमधून पैसे काढताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घ्या.

 

एटीएम कार्डमधून पैसे काढताना या चुका टाळा, खबरदारी घ्या.

 

तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाता तेव्हा एटीएमच्या आजूबाजूचा परिसर काळजीपूर्वक तपासा.

 

फसवणूक करण्यासाठी अनेकदा गुन्हेगार एटीएमच्या आसपास क्लोनिंग उपकरणे बसवतात. त्यामुळे तुमच्या एटीएम कार्डचा क्लोन तयार होतो. याद्वारे गुन्हेगार तुमच्या खात्यातील रक्कम काढू शकतात.

 

तुम्ही एटीएम कार्डचा पिन टाकल्यावर, तुमच्या जवळपास कोणताही छुपा कॅमेरा आहे का ते तपासा.

 

ज्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक आहेत, अशाच एटीएमचा वापर करा.

 

 

एटीएम कार्ड फसवणूक झाल्यास ‘हे’ करा ( ATM Card Fraud )

 

तुम्ही एटीएम कार्ड (ATM Card) वापरून पैसे काढता, तुमच्या व्यवहार यशस्वी होऊन खात्यातून पैसे कापले जातात, मात्र एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येत नाहीत, असं काही वेळा घडतं. तुमच्यासोबतही असं एखाद्या वेळेस तरी नक्कीच झालं असेल. अशा वेळी, सहजा 24 ते 48 तासांच्या आत तुमचे पैसे पुन्हा तुमच्या खात्यावर जमा होतात. पण, त्यानंतरही असं झालं नाही, तर तुमच्या बँकेशी संपर्क करुन त्यांच्याकडे तक्रार करा. जर तुमच्या खात्यावरुन तुमची फसवणूक झाली असेल तर, तुम्ही त्याची तक्रार तात्काळ बँक आणि सायबर सेलकडे करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -