आयपीएल 2024 स्पर्धेतील एकूण 54 सामने संपले असून एकाही संघाने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलेलं नाही. सध्याच्या स्थितीत काही संघांचं प्लेऑफचं जर तरवर अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्या संघाला किती सामने जिंकले तर प्लेऑफमध्ये स्थान मिळेल? याबाबतची उत्सुकता वाढली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. कोलकात्याने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच नेट रनरेट चांगला असल्याने अव्वल स्थानी आहे. आयपीएलमध्ये 16 गुण मिळवणारा संघ सहज क्वॉलिफाय करतो. त्यामुळे या संघांचं निश्चित झालं आहे. त्यामुळे उर्वरित तीनपैकी एक सामना जिंकला की झालं. अशीच काहीशी स्थिती राजस्थान रॉयल्सची आहे. राजस्थानने 10 पैकी 8 सामन्यात विजय मिळवून 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चार पैकी 1 सामना जिंकलं की झालं.
चेन्नई सुपर किंग्स 11 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. आता उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल. सनरायझर्स हैदराबादने 10 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. चार पैकी तीन सामने जिंकले प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. लखनौ सुपर जायंट्सचे 11 सामन्यांत 6 विजयासह 12 गुण आहेत. उर्वरित तीन सामने जिंकले तरच ते थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. पण नेट रनरेटवर लक्ष ठेवावं लागणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघ 11 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. उर्वरित 3 सामने जिंकले तरच दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल. पण पॉइंट टेबलमधील टॉप 4 संघांपैकी एकाने शेवटी 16 गुण मिळवले तरच संधी आहे. ते पण नेट रनरेट ठरवणार काय ते.
आरसीबी संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले असून 4 सामने जिंकून एकूण 8 गुण मिळवले आहेत. आता उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. तसेच इतर संघांच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागेल. टॉप चारमधील एका संघाचे 14 गुण राहिले आणि नेट रनरेट व्यवस्थित असेल तरच संधी आहे. असंच काहीसं पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांचंही आहे. इतर सामने जिंकावे लागतील. तसेच नेट नेटरेटही सुधारावा लागेल.
मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान खऱ्या अर्थाने संपुष्टात आलं आहे. कारण पॉइंट टेबलमधील टॉप चार संघांनी आधीच 12 गुणांचा टप्पा गाठला आहे. चेन्नई, हैदराबाद आणि लखनौने एक सामना जिंकला की मुंबईचा पत्ता कट होईल. इतकंच काय तर मुंबईने तीन पैकी एक सामना गमवला की गणिती आव्हान संपुष्टात येईल.