Friday, August 1, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत 'तो' आला आणि एका दमात सगळंच गार केला....

इचलकरंजीत ‘तो’ आला आणि एका दमात सगळंच गार केला….

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

इचलकरंजीत ‘तो’ आला आणि एका दमात सगळंच गार केला…. अशा चर्चा शनिवारी सायंकाळ नंतर सुरू झाल्या. आणि या केवळ चर्चा न राहता सोशल मीडियावर देखील ट्रेडिंग मध्ये हा विषय अद्याप सुरू आहे.

लोकसभा निवडणुका होऊन अद्याप चार दिवस ही झालेली नाहीत. यादरम्यान राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेते शहर व परिसरात विविध सभा निमित्त हजेरी लावून गेले. यामध्ये अनेकांनी विविध फैरी झाडत वेगवेगळ्या सभा गाजवून ठेवल्या.

त्यामुळे आज हा नेता येणार उद्या तो नेता येणार, आज या पक्षाच्या या नेत्यांनी हे म्हटलं आणि विरोधकांना थंड वसवलं, तर उद्या विरोधकाच्या कोणी आग पाखड करून थंड झाल्यावर वातावरण पेटवले. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून शहरात तो आला त्याने असे म्हटले याने असे म्हटले. अशा चर्चा सुरू होत्या.

आता निवडणुका होऊन दोन-चार दिवस उलटले या चर्चा थोड्या थंड होत चालले आहेत. दरम्यान आज इचलकरंजीत शनिवारी संध्याकाळी एक मोठी चर्चा सुरू झाली ती म्हणजे इचलकरंजीत ‘तो’ आला आणि एका दमात सगळंच गार केला…. अशी चर्चा सुरू झाली.

आता यामध्ये इचलकरंजी झालेला तो म्हणजे कोण? असा गमतीचा प्रश्न किती असलेल्या काही जणांना पडला. जेव्हा तो म्हणजे कोण हे त्याने जाणून घेतलं तेव्हा कळाले की ही चर्चा शनिवारी सायंकाळी इचलकरंजी झालेल्या होळीच्या पावसाची होती.

गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या वलिवाच्या पावसाने शनिवारी सायंकाळी हजेरी लावून वातावरण एकदम थंड करून सोडले. आणि यालाच ही मंडळी इचलकरंजीत ‘तो’ आला आणि एका दमात सगळंच गार केला…. असे म्हणत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -