Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्र₹२१५० वरुन ₹४७२ वर आला 'हा' शेअर; आता गुंतवणूकदारांच्या खरेदीसाठी उड्या, कारण...

₹२१५० वरुन ₹४७२ वर आला ‘हा’ शेअर; आता गुंतवणूकदारांच्या खरेदीसाठी उड्या, कारण काय?

पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर २,१५० रुपयांच्या आपल्या आयपीओ किमतीपेक्षा खूपच कमी असून तो ४७२ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. त्यातही गेल्या दोन सत्रात जवळपास १४ टक्क्यांनी वाढ झालीये. सोमवारी या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली. कामकाजादरम्यान तो ९ टक्क्यांनी वाढून ४७५.८५ रुपयांवर पोहोचला.

यापूर्वी शुक्रवारीही त्यात ६ टक्के वाढ झाली होती. आजच्या तेजीमुळे पेटीएमचे शेअर्स पाच महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. तज्ज्ञांकडून समजून घेऊया की ही खरेदीची संधी आहे की त्यापासून दूर राहणं योग्य ठरेल?

या वर्षाच्या सुरुवातीला आरबीआयनं पेटीएम पेमेंट बँकेवर मोठी कारवाई केली होती. यामुळे पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि रिकव्हरीपूर्वीच हा शेअर ७६० रुपयांच्या पातळीवरून ३१० रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला.

 

आता का तेजी?

 

गेल्या आठवड्यात पेटीएमने पेटीएमच्या व्यापारी भागीदारांसाठी डिझाइन केलेली आणि ‘पेटीएम फॉर बिझनेस’ अॅपद्वारे उपलब्ध असलेली विशेष आरोग्य आणि इन्कम प्रोटेक्शन प्लान “पेटीएम हेल्थ साथी” सुरू करण्याची घोषणा केली.

 

आता काय कराल?

 

ट्रेडबुल्स सिक्युरिटीजचे सच्चितानंद उत्तेकर यांनी सीएनबीसी टीव्ही १८ शी बोलताना सांगितलं की, पेटीएमसाठी ही नवीन अपट्रेंडची सुरुवात आहे. या गतीमुळे हा शेअर ५४० रुपयांच्या पातळीवर जाईल, अशी अपेक्षा आहे. ती कमी झाली तर ४४० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याची तयारी ठेवा. त्यांनी आपल्या ग्राहकांना स्टॉकची शिफारस केली आहे. मे २०२२ मध्ये एलआयसी पुढे जाण्यापूर्वी पेटीएम हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ होता. मात्र, हा शेअर २,१५० रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा बऱ्यापैकी डिस्काऊंटेड प्राईजवर लिस्ट झाला आणि तेव्हापासून तो स्तरही गाठलेला नाही. कंपनीचा शेअर आपल्या आयपीओ प्राईज पेक्षा ७८ टक्क्यांनी खाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -