Saturday, September 7, 2024
Homeजरा हटकेमुलांना शाळेच्या डब्यात काय द्यायचं असा प्रश्न पडलाय? मग कुरकुरीत कोबीचे कटलेट...

मुलांना शाळेच्या डब्यात काय द्यायचं असा प्रश्न पडलाय? मग कुरकुरीत कोबीचे कटलेट बनवा; पौष्टीक रेसिपी लगेच लिहून घ्या

आठवड्यातून एकदा तरी दुपारी, रात्रीच्या जेवणात तर डब्याला कोबीची भाजी ही आवर्जून असतेच. लहान मुलांनाही डब्यात कोबीची भाजी बघून खायला खूप कंटाळा करतात. म्हणून आई कधी तरी कोबीची भजी, कोबीचे पराठे बनवते. पण, तुम्ही हे सगळे पदार्थ अनेकदा खाल्ले असतील. तर आज आपण कोबीचे कटलेट कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता ; जो खायला पौष्टीक व टेस्टी सुद्धा आहे. चला तर तुम्हीसुद्धा साहित्य व कृती लिहून घ्या.

 

साहित्य :

 

१. एक कप कोबी२. १/२ कप किसलेले पनीर३. १/२ कप किसलेले चीज (पर्यायी)४. तीन ते चार स्मॅश केलेले बटाटे५. कोथिंबीर६. एक ते दोन चमचे हिरवी मिरची७. एक चमचा मीठ८. एक चमचा गरम मसाला९. १/४ चमचा लाल मिरची पावडर१०. १/४ चमचा हळद पावडर११. एक चमचा आंबा (मँगो) पावडर१२. १/४ कप मक्याचं पीठ१३. तेल

2. कृती :

 

१. एका भांड्यात एक कप कोबी, किसलेलं चीज, पनीर, स्मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, आंबा (मँगो) पावडर, मक्याचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.२. त्यानंतर हाताला थोडं तेल लावा.३. त्यानंतर मिश्रणाचे छोटे-छोटे तुमच्या आवडीनुसार गोळे किंवा आणखीन कोणत्या आकारात तुम्हाला कटलेट बनवायचे असतील तर तसंही तुम्ही बनवू शकता.४. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवा. त्यात थोडं तेल घाला आणि कोबीचे कटलेट मंद आचेवर भाजून घ्या.५. अशाप्रकारे तुमचे ‘कोबीचे कटलेट’ तयार.

2. कोबीमधील व्हिटॅमिन सी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतो.कोबीमध्ये व्हिटॅमिन के देखील आहे ; जे रक्ताच्या गुठळ्या थांबवण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. कोबीमधील बी जीवनसत्त्वे चयापचय आणि मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. तर अशा अनेक फायद्यांनी भरपूर कोबीपासून तुम्हीदेखील कोबीचे कटलेट बनवा आणि लहान मुलांच्या डब्यात त्यांना खायला द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -