Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रकर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास; उर्वरित कर्ज कोण फेडणार? जाणून घ्या नियम

कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास; उर्वरित कर्ज कोण फेडणार? जाणून घ्या नियम

अनेक लोकांना मोठमोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याची गरज लागते. कारण एक रकमी त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात. त्यामुळे अनेक लोक बँकांमधून कर्ज घेतात. आजकाल कर्ज घेण्याची सुविधा देखील अत्यंत सहज आणि सोपी झालेली आहे. बँकांच्या माध्यमातून कर्ज घेणे अगदी सोपे झालेले आहे. अनेक लोक होम लोन, कार लोन तसेच वैयक्तिक लोन यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड देखील मोठ्या प्रमाणात आलेला आहे. क्रेडिट कार्ड हा देखील कर्जाचा एक प्रकार आहे. तुम्ही बँकेचे पैसे आधी वापरता आणि त्यानंतर तुम्हाला या क्रेडिट कार्डचे बिल भरावे लागते. जेव्हा आपण कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतो. तेव्हा त्या बँकेच्या अनेक अटी असतात. त्यांच्या नियमात राहूनच आपल्याला ते कर्ज देत असतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतले आणि अचानक त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अशावेळी कर्जाची परतफेड कोण करणार? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

 

होम लोन

जर कोणत्याही व्यक्तीने होम लोन घेतले असेल, तर त्या बदल्यात आपण बँकेकडे तारण म्हणून घराचे कागदपत्र किंवा जेवढे कर्ज घेतले आहे, त्या रकमेची कोणती तरी मालमत्ता ठेवतो. परंतु जर तुम्ही होम लोन घेतल्यानंतर मध्येच अर्जदाराचा मृत्यू झाला, तर त्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी ही व्यक्तीचा वारस किंवा त्याच्यासोबत जो कोणी अर्जदार असेल त्याच्यावर असते. परंतु जर या कर्जाचे परतफेड केली नाही, तर बँक कर्ज ठेवलेली तारण मालमत्ताचा लिलाव करते आणि पैसे वसूल करते.

 

कार लोन

सध्या कार खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक लोल कार खरेदी करण्यासाठी लोन घेत असतात. जर एखाद्या व्यक्तीने गाडी खरेदी केली आणि मध्येच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ते कर्ज त्या व्यक्तीचे वारस किंवा कुटुंबातील सदस्यांना परतफेड करावी लागते. परंतु त्यांच्या कुटुंबाकडून त्या रकमेची परतफेड केली नाही, तर बँक फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून ती कार किंवा कोणतेही वाहन असेल ते जप्त करतात आणि त्या कारची विक्री करून फायनान्स कंपन्या त्यांच्या कर्जाची थकबाकी वसूल करतात.

 

पर्सनल लोन

आज-काल पर्सनल लोन घेण्याचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे असुरक्षित प्रकारातले कर्ज आहे. म्हणजेच पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोष्ट तारण ठेवण्याची गरज नसते. परंतु जर पर्सनल लोन घेतलेल्या व्यक्तीचा मध्येच मृत्यू झाला, तर बँकेच्या माध्यमातून कुटुंबातील कोणत्याही सदस्याला या कर्जाची परतफेड करावी लागते. हे पर्सनल लोन त्या व्यक्तीने त्याच्या उत्पन्नाच्या आधारावर घेतलेले असते.

 

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्डवर आपण जी रक्कम वापरतो. ती देखील एक गरजेचे स्वरूपातच असते. या कर्जाची परतफेड करणे ही त्या संबंधित व्यक्तीची जबाबदारी असते. परंतु जर त्या क्रेडिट कार्डचा मृत्यू झाला, तर कर्जाची थकबाकी राईट ऑफ करते. तसेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला क्रेडिट कार्डवरील खर्च केलेल्या रकमेबद्दल परतफेड करण्यासाठी जबाबदार धरले जात नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -