Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग‘या’ गावातील लोक मत्स्यपालन करून झाले करोडपती; गावात उभारले 40 मत्स्यकेंद्र

‘या’ गावातील लोक मत्स्यपालन करून झाले करोडपती; गावात उभारले 40 मत्स्यकेंद्र

आज काल अनेक शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने वेगवेगळे प्रयोग शेतात करायला लागलेले आहेत. आणि त्यातीलच एक यशस्वी प्रयोग म्हणजे मत्स्य शेती. आजकाल अनेक शेतकरी मत्स्य शेती करतात. आणि त्यातून लाखो रुपयांचा नफा कमवतात. आज आपण अशाच एका गावाची यशस्वी स्टोरी जाणून घेणार आहोत. ज्यांनी मत्स्य शेतीतून कोट्यावधी रुपये कमावलेले आहेत. या गावांमध्ये जवळपास 40 पेक्षा जास्त मत्स्य केंद्र आहेत. या गावातील शेतकरी वर्षाला जवळपास एक ते दोन कोटी रुपयांचा नफा कमवत आहे.

 

मत्स्य शेती हा एक असा प्रकार आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी खर्च करून जास्त नफा कमवू शकता. उत्तर प्रदेशातील रामपूर मधील धनोरा गावामध्ये अनेक शेतकरी मत्स्य पालन करतात. आणि त्यातील त्यातून चांगला नफा मिळवतात. या ठिकाणी जवळपास 40 पेक्षा जास्त मत्स्य केंद्र आहेत. मत्स्य शेती करण्यासाठी या गावांमध्ये मोठे तलाव हॅचरी बांधण्यात आलेले आहेत. या ठिकाणी शेतकरी मत्स्य केंद्र तयार केले आहे. जे युपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना यांसारख्या विविध राज्यांमध्ये दिले जातात. या गावातील एका शेतकऱ्याने माहिती दिली की, ते लोक 2003 पासून मत्स्यपालन करतात. आणि जवळपास 18 एकर जमिनीवर मत्स्य बीजाचे काम करतात.

 

या जमिनीवर विविध प्रकारचे मासे तयार केले जातात. आणि याची विक्री देखील स्थानिक बाजारपेठेसह विविध राज्यांमध्ये केली जाते. बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये मत्स्य शेती केली जाते. ज्या शेतकऱ्यांची जमीन नापीक आहे, त्या नापिक क्षेत्रावर मत्स्य शेतीचा प्रयोग केलेला आहे.

 

हे मत्स्य केंद्र सुरू करण्यासाठी त्यांना सरकारकडून देखील अनुदान मिळालेले आहेत. सरकारकडून जवळपास 50 लाख रुपयांचे अनुदान केलेले आहे. एका प्रकल्पासाठी एकूण 25 लाख रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे सरकारकडून देखील चांगली मदत होते. या ठिकाणातील शेतकऱ्यांनी सांगितले की, मत्स्य पालनातून जेवढा नफा होतो, तेवढा इतर कोणत्याही व्यवसायातून होत नाही. तुम्ही जर माशांची योग्य पद्धतीने काळजी घेतली, तर तुम्ही वर्षाला दीड ते दोन कोटी रुपये सहज कमाऊ होऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -