लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित महिलांच्या खात्यात जमा केले. आता निवडणुका पार पडल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींचे 10 हजार अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर होती. या तारखेपर्यंत पुणे जिल्हा प्रशासनाकडे पुणे जिल्हा प्रशासनाकडे 21 लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीची आाचारसंहिता लागल्याने या पैकी अनेक अर्जांची छाननी झाली नव्हती. पण आता निवडणुका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची पुन्हा छाननी सुरू करण्यात आली आहे. या छाननीत आतापर्यंत 10 हजार अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. म्हणझेच 10,000 महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. या संदर्भात महाराष्ट्र टाइम्सने वृत्त दिलं आहे.
छाननी करण्यात आलेल्या अर्जांपैकी 9814 अर्ज त्रुटींमुळे बाद ठरवण्यात आले आहेत. तर 5724 अर्जांमध्ये किरकोळ त्रुटी आढळून आल्याने ते अर्ज तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. या अर्जदारांना त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात येत आहे. अद्यापही 12 हजार अर्जांची छाननी होणे बाकी आहे.
या संदर्भात महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी माहिती दिली की, लाडकी बहीण योजनेसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी 12000 अर्जांची छाननी होणे बाकी आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. सुमारे 10 हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. लाडक्या बहिणींना आता पुढचा हप्ता कधी मिळणार यासंदर्भात सरकारकडून लवकरच माहिती देण्यात येईल.
अपप्रचाराला बळी पडू नये – अदिती तटकरे
या संदर्भात अदिती तटकरे यांनी माहिती दिली की, माझ्या नावाने खोटी माहिती पसरवून काही माध्यमांकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना अर्थसंकल्पात योग्य प्रकारे नियोजन करून कबूल केलेल्या 2100 रुपयांच्या लाभाबाबत निर्णय घेतला जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ मिळत आहे. ही योजना राबवत असताना सर्व लाभार्थी महिलांची पडताळणी करूनच त्यांना लाभ वितरित करण्यात आला आहे. म्हणून, सध्या नोंदणी करत असलेल्या लाभार्थ्यांच्या पडताळणीच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही पडताळणी होणार नाही. कृपया याबाबत कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये ही सर्वांना नम्र विनंती असंही अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
पात्र लाभार्थी बहिणींचे केवायसी, आधार सिडींग नाही त्यामुळे त्या या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सरकारकडून यापूर्वीच करण्यात आले होते.
बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक आहे की नाही कसे तपासावे ?
सर्व प्रथम https://uidai.gov.in या लिंकवर क्लिक करा.
यानंतर आधार लिंकिंग स्टेटस (Aadhaar Linking Status) या लिंकवर क्लिक करा.
मग Bank Seeding Status या लिंकवर क्लिक करा.
आता तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा इंटर करुन ओटीपीच्या सहाय्याने लॉग ईन करा.
यानंतर uidai.gov.in या साईटवर तुमचे लॉग ईन होईल. या ठिकाणी तुमच्या आधार कार्डसोबत कोणत्या बँकेचे खाते लिंक आहे याची माहिती दिसून येईल.
जर तुम्ही अर्जसोबत दिलेल्या बँक खाते त्यात नसेल तर बँकेत भेट देऊन आपल्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करुन घ्या.