Thursday, July 24, 2025
Homeमहाराष्ट्रआई-वडिलांना घराबाहेर काढलेल्या मुलांना दणका

आई-वडिलांना घराबाहेर काढलेल्या मुलांना दणका

वय झालेले आई-वडील मुलांना नकोसे होतात. स्वतःच्या संसारात रमलेल्या मुलांना वृद्ध माता-पिता ओझे वाटतात. त्यांची संपत्ती पाहिजे असते, पण ते नकोसे होतात. ज्या मुलांना लहानपणापासून जपले, तेच पुढे आई-वडिलांना घराबाहेर काढतात किंवा वृद्धाश्रमात पाठवतात.

 

असाच प्रकार चिकोडी तालुक्यातील उमराणी गावात घडला होता. दोन कर्त्या मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढले होते. तत्पूर्वी त्यांच्याकडील दागिने आणि संपत्ती बळकावली होती. मात्र अशा मुलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निर्णय चिकोडी प्रांताधिकार्‍यांनी देताना वृद्ध दांपत्याचे दागिने आणि संपत्ती त्यांना परत करण्यास मुलांना भाग पाडलेच, शिवाय त्यांना त्यांचे घरही परत मिळवून दिले. ज्येष्ठ नागरिक हितरक्षण कायद्याच्या कलम 7 खाली त्यांनी हा निर्णय देताना निर्दयी मुलांना दणका दिला आहे.

 

वडिलोपार्जित संपत्ती व दागिने घेऊन दोन्ही मुलांनी वृद्ध आई-वडिलांना घरातून हाकलून दिल्यामुळे सदर दाम्पत्याने चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी सदर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांना न्यायालयात बोलावून वडिलोपार्जित बळकावलेली संपत्ती व सोने दागिने परत देऊन सदर त्यांना न्याय मिळवून दिला आहे.

 

कर्नाटक राज्य विद्युत निगममधून सेवानिवृत्त झालेले उमराणी (ता. चिकोडी) येथील रामनगौडा पाटील व शैला पाटील यांच्या दोन्ही मुलांनी वडिलोपार्जित संपत्ती व आईचे दागिने घेऊन त्यांना घरातून बाहेर काढले हाते. उतार वयात चालणे मुश्कील झाले असताना मुलांनी घराबाहेर काढल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले होते. मुलांना धडा शिकविण्यासाठी त्या वृद्ध दाम्पत्याने प्रांताधिकार्‍यांकडे धाव घेतली. त्यांनी चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक हितरक्षण कायदा 2007 या कायद्यांतर्गत न्याय मागितला होता.

 

याप्रकरणी प्रांताधिकारी संपगावी यांनी चौकशी सदर वृद्ध दाम्पत्याला त्यांची जमीन व दागिने मिळवून दिले आहेत.

 

आपल्या वाट्याची जमीन व संपत्ती आम्हालाच मिळावी, या मागणीसाठी गेल्या 17 वर्षापासून लढा हे दाम्पत्य लढा देत होते. नोकरी करत असताना रामनगौडा पाटील यांनी वडिलोपार्जित 2 एकर 10 गुंठे जमीन संपादित करून घर बांधले आहे. त्यांची पत्नी शैला यांच्याजवळ 150 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. मात्र, दोन्ही मुलांनी त्यांची संपत्ती व दागिनेही स्वतःकडे ठेवून घेतले होते. अखेर 17 वर्षांनतर या दाम्पत्याला न्याय मिळाला आहे.

 

रामनगौडा पाटीलमुलांनी घरातून बाहेर काढल्यामुळे आपले जगणे मुश्कील झाले होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत होतो. याबाबत दै. ‘पुढारी’त 15 दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध झाले होते. या बातमीची दखल घेऊन प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -