OpenAIचा लोकप्रिय एआय चॅटबॉट ChatGPT जगभरातील हजारो वापरकर्त्यांसाठी बंद पडला. अचानक बंद पडल्याने ChatGPT वापरण्यात समस्या उद्भवू लागल्या. तर यामध्ये अनेकांना त्याच्या सेवामध्ये प्रवेश करता आला नाही. ही समस्या अमेरिकेत जास्त दिसून आली, जिथे 8500 हून अधिक वापरकर्त्यांनी आउटेजची तक्रार केली आहे. वापरकर्त्यांनी लॉगिन न करणे, एरर मेसेजेस आणि चॅट लोड होत नसणे यासारख्या समस्यांच्या तक्रारी केल्या आहेत. तथापि यावर Open AI चा प्रतिसाद देखील आला आहे.
आउटेजचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, 81 टक्के वापरकर्त्यांना चॅटजीपीटीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला. तर 10 टक्के वापरकर्त्यांना वेबसाइटमध्ये समस्यांचा सामना करावा लागला. त्याचवेळी 9 टक्के वापरकर्त्यांना मोबाईल ॲपमध्ये समस्या येत आहेत.
अशातच आपल्या भारतातील काही वापरकर्त्यांनाही या समस्येला सामोरे जावे लागले असून याबद्दलच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. सकाळी 7:30 पर्यंत फक्त 153 वापरकर्त्यांनी आउटेजची समस्या उद्भवली होती.
कोणत्या प्रकारची समस्या ?
वापरकर्त्यांना येणाऱ्या समस्यांमध्ये लॉगिन न करणे, वारंवार “Error” मेसेज येणे, चॅट लोड न होणे आणि Unusual activity अलर्ट अशा अनेक समस्या यादरम्यान निर्माण झाल्या होत्या. सोशल मीडियावर अनेक लोकांनी या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे याचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत.
OpenAI ने उत्तर दिले
ओपनएआयने त्यांच्या Service Status Page वर ही समस्या मान्य केली असून यावेळी वापरकर्त्यांना सांगितले की त्यांनी काही सेवांमध्ये अधिक त्रुटी येत असल्याचे ओळखले आहे. तर ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यावरून असे दिसून येते की कंपनीने तात्काळ कारवाई कडे लक्ष दिले असून वापरकर्त्यांना उद्भवणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी टेक्निकल टीम या समस्या दूर करण्यासाठी सज्ज करण्यात आलेली आहे. तथापि अद्याप ही समस्या पूर्णपणे दुरुस्त झाल्याची पुष्टी झालेली नाही.
भारतात कमी प्रभाव
जरी भारतातील काही वापरकर्त्यांनी या समस्येबद्दल तक्रार केली असली तरी ही संख्या अमेरिकेपेक्षा खूपच कमी होती. कारण आपल्या भारतातील इंटरनेटची स्थिरता आणि वापरकर्त्यांचे लोकेशन हे देखील याचे एक कारण असू शकते.
काय कारण होते आउटेजचं ?
ओपनएआयने अद्याप आउटेजचे कोणतेही कारण दिलेले नाही. परंतु Unusual activity चे अलर्ट सूचित करतो की काही तांत्रिक किंवा सुरक्षिततेशी संबंधित कारणे असू शकतात. अनेकदा जास्त ट्रॅफिक, सिस्टम अपडेट्स किंवा सायबर हल्ल्यांसारख्या गोष्टी आउटेजचे कारण बनू शकतात