आज सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जात आहे. तत्पुर्वी गेल्या काही सत्रांपासून सातत्याने घसरणारा शेअर बाजार बजेटच्या आधी एक तासांपूर्वी वधारला. सेन्सेक्सने ८०० अंकांनी उसळी घेतली आहे. तर निफ्टी २०० हून अधिक अंकांनी वधारला आहे. सोमवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 813 अंकांनी तर निफ्टी 237 अंकांनी वधारून बंद झाला होता.
शेअर बाजाराच्या आजच्या सत्रात अर्थसंकल्प सादर होण्याआधी शेअर बाजारात उत्साह दिसून आला. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सने जवळपास 800 अंकांनी उसळी मारली तर निफ्टीने 17, 529 अंकाचा टप्पा गाठला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 17578 अंकांवर व्यवहार करत होता. यावेळी ब्रिटानिया, सन फार्मा, आयसीआयसीआय, कोटक, एचडीएफसी, इन्फोसेस, बजाज फिनसर्व्ह, अदानी, रिलायन्स सारखे दिग्गज शेअर्स 2 ते 4 टक्क्यांनी वधारले होते.