ताजी बातमी/ऑनलाइन टीम
10 वी पास महिलांसाठी नोकरीची मोठी संधी आली आहे. या कामाचा प्रकार ऑफिस मधील असून दिवसाच्या शिफ्ट मध्येच करायचं आहे. याचा पगार सरकारी वेतनश्रेणीवर अवलंबून आहे. तर महिलांसाठी असणारे ही नोकरी कुठे असेल? काय असेल वेतन हे जाणून घेण्यासाठी आत्ताच खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा…
पदाचे नाव: सफाई महिला कर्मचारी
पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणे आवश्यक आहे.
या पदांसाठी महिला कर्मचाऱ्यांनीच अर्ज दाखल करायचे आहेत. तसेच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वेतन :
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रुपये9,000 इतका पगार दिला जाणार आहे.
निवड पद्धत:
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.
यानंतर उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे.
कामाचे ठिकाण :
परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020
परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201
अर्ज करण्याचा पत्ता :
परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020 किंवा परिवार
नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 21 फेब्रुवारी 2022
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
टीप: ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व नोकरी विषयक बातम्या या विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून खात्री करूनच आम्ही प्रसिद्ध करत असतो. तरीही नजरचुकीने काही नोकरीच्या जाहिराती चुकीच्या प्रसिद्ध होऊ शकतात. यामुळे उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करताना सदर भरतीची खात्री करूनच आपले अर्ज भरावेत. भरतीसाठी कोणत्याही आर्थिक किंवा इतर नुकसानीस ताजी बातमी टीम जबाबदार राहणार नाही. याची उमेदवारांनी नोंद ठेवावी.