देशात डिजिटल क्रिप्टो करन्सीने अनेकांची फसवणूक केली आहे. पुण्यात याचा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने मोठा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. क्रिप्टो करन्सीशी संबंधित देशात नोंदवण्यात आलेल्या पहिल्या गुन्ह्यात, जप्त करण्यात आलेले बीटकॉईन परस्पर आपल्या खात्यात वळती करून घेतल्याची घटना उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्हयात तपासासाठी तांत्रिक मदत करणाऱ्या दोन तपास अधिकाऱ्यांनीच हे कृत्य केलं आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी दोन संगणकतज्ञ पंकज प्रकाश घोडे (वय 38, रा. ताडीवाला रोड) आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (वय 45, रा. बिबवेवाडी) याना अटक केल आहे. या दोघांनी तब्बल 20 कोटी रुपयांचे बिटकॉइन हडप केल्याचं समोर आलं आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत 2018 मध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने बऱ्याच जणांना फसविणाऱ्या आरोपींविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाणे आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद झाली होती. क्रिप्टो करन्सी संदर्भात पहिला गुन्हा पुणे शहरात 2018 मध्ये दाखल झाला होता. या गुन्ह्यातील कोट्यवधी रुपयांचे आभासी चालन जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी तांत्रिक तज्ज्ञ म्हणून या दोघांची मदत घेतली होती. मात्र या दोघांनी पोलिसांची दिशाभूल करत क्रिप्टो करन्सी स्वत:च्या व इतर अन्य साथीदारांच्या वॉलेटमध्ये परस्पर वळवून घेतल्याचे उघड झाले आहे.
आरोपींकडून क्रिप्टो करन्सी जप्त करताना तांत्रिक तज्ज्ञांनी संशयास्पद वागत असल्याचा संशय राज्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालकांना आला. याबाबत त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या चौकशीत तांत्रिक पुराव्यावरुन त्यांचे के वाय सीवरुन या दोघांनी परस्पर क्रिप्टो करन्सी व मोबाईल, मॅकबुक, हार्ड डिस्क, टॅब, लॅपटॉप, सिडी, पेन्ड्राईव्ह, मेमरी कार्ड, स्मार्ट वॉच, हॉटस्पॉट, सीडी, इंटरनेट डोंगल अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने दोघांना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.