Tuesday, July 29, 2025
Homeमनोरंजनकरिअरमधला पहिलाच रॅम्प वॉक अन् अभिनेत्री झाली ट्रोल Video

करिअरमधला पहिलाच रॅम्प वॉक अन् अभिनेत्री झाली ट्रोल Video

ताजी बातमी ऑनलाइन टीम
कपूर कुटुंबातील आणखी स्टार किड बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र पदार्पणापूर्वीच तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांची ही मुलगी शनाया कपूर आहे. आगामी ‘बेधडक’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र त्यापूर्वी तिच्या (career) करिअरमधला पहिला रॅम्प वॉक सोशल मीडियावर फारच चर्चेत आला आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या शोसाठी शनाया शो स्टॉपर होती. यावेळी तिने निळा-काळा-जांभळा रंगसंगतीचा कट-आऊट गाऊन परिधान केला होता. या रॅम्प वॉकचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी तिला तिच्या वॉकसाठी ट्रोल केलं आहे.


मनिष मल्होत्रासह शनायाचे कुटुंबीय आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा अंदाज फारसा आवडला नाही. ‘ही बदकासारखी का चालतेय’, असं एकाने विचारलं. तर ‘आतापर्यंतचा हा सर्वात वाईट ऱॅम्प वॉक होता’, असं दुसऱ्याने म्हटलं. काहींनी तिला इतर अभिनेत्रींकडून शिकण्याचा सल्लाही दिला. दुसरीकडे शनायाची खास मैत्रीण सुहाना खान आणि अनन्या पांडे यांनी तिचं कौतुक केलं.

निर्माता करण जोहर शनायाला बॉलिवूडमध्ये लाँच करत असून शशांक खैतान ‘बेधडक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात लक्ष्य आणि गुरफतेज पिरझादा हे दोन नवे चेहरेसुद्धा दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी शनायाने या चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता.

बोल्ड फोटोंमुळे शनाया राहिली चर्चेत

शनाया तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे विविध फोटो शेअर करत असते. यामध्ये तिचे अनेक बोल्ड फोटोज देखील आहेत. विशेष म्हणजे ते फोटो बघितल्यानंतर शनाया नव्या स्टाईलसाठी नेहमी वेगवेगळे एक्सपरिमेंट करते, असं लक्षात येईल. शनायाने इन्स्टाग्रामवर बिकिनी लूक्सचे देखील फोटो शेअर केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -