Thursday, February 6, 2025
Homeमनोरंजन'पुष्पा' फेम रश्मिका मंदानाने 'Animal' मधून परिणीती चोप्राचा केला पत्ता कट!

‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदानाने ‘Animal’ मधून परिणीती चोप्राचा केला पत्ता कट!

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाशी संबंधीत नवी माहिती समोर आली आहे. परिणीती चोप्रा डच्चू दिल्यानंतर या चित्रपटात ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदानाची दमदार एन्ट्री झाली आहे. यापूर्वी ॲनिमलमध्ये बॉलीवूड स्टार रणबीर कपूर आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा एकत्र दिसणार होते. पण आता रणबीरसोबत रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे रश्मिकाने परिणीतीचा पत्ता कट केल्याची चर्चा रंगली आहे.

अॅनिमल’ हा चित्रपट सध्या सतत चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्राने संदीप वंगा यांच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातून आपले नाव माघारी घेतल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अखेर हे वृत्त खरे ठरले. परिणीतीने चित्रपट सोडल्यापासून निर्माते नवीन नायिकेच्या शोधात होते. अखेर त्यांनी रश्मिकाच्या नावावर शिक्कामोर्तब करून हा शोध संपवला.

अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी रश्मिकाला मुख्य भूमिकेसाठी साइन करण्यात आले आहे. भूषण कुमार आणि संदीप रेड्डी या चित्रपटाच्या निर्मात्यांना विश्वास आहे की, ही भूमिका रश्मिकासाठीच योग्य आहे. निर्मात्यांना रणबीरसोबत नवीन चेहरा साईन करायचा होता, त्यामुळे आता रश्मिकाला चित्रपटाचा भाग बनवण्यात आले आहे. यासोबत रश्मिका आणि रणबीरची केमिस्ट्रीही जबरदस्त जुळेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.

चित्रपटाचे शूटिंग यावर्षी जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. ‘अ‍ॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी ‘कबीर सिंग’, ‘अर्जुन रेड्डी’ सारखे अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. लवकरच रणबीर कपूर आलिया भट्टसोबत ‘ब्रह्मास्त्र’ मध्येही दिसणार आहे. तसेच रश्मिका मंदानाकडे सध्या अनेक बॉलिवूड चित्रपट आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -