Friday, July 4, 2025
Homeबिजनेस‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल

‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल

2020 आणि 2021 असे सलग दोन वर्ष जगासह देशावर कोरोनाचे संकट (COVID-19 Pandemic) होते. या काळात शेअरबाजारावर देखील प्रचंड दबाव होता. गुंतवणूकदार शेअर मार्केटमधील आपली गुंतवणूक कमी करत असल्याने शेअर बाजारात तीव्र घसरण होती. शेअर कोसळत होते. 23 मार्च 2020 ला शेअर मार्केटने निचांकी पातळी गाठली होती. मात्र त्यानंतर शेअर बाजारात सुधारणा होत गेल्याचे पहायला मिळाले.

याच काळात अनेक मल्टीबॅगर शेअर्स उदयाला आले. ज्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 190 पेक्षा अधिक शेअर्स हे मल्टीबॅगर ठरले, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा परतावा दिला. यातीलच एक शेअर हा बोरोसिल रिन्यूअल्स लिमिटेडचा आहे. या कंपनीचा शेअर्स गेल्या दोन वर्षात 36 रुपयांपासून वाढत जाऊन तब्बल 671.45 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा फायादा झाला आहे.

एकमेव सौर ग्लास निर्मिती कंपनी
मुंबईस्थित बोरोसिल रिन्यूअल्स ही भारतातील सौर ग्लास निर्माण करणारी भारतातील एकमेव कंपनी आहे. केंद्र सरकारकडून सध्या अक्षय ऊर्जेवर भर दिला जात आहे. सुर्यापासून जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करण्यात येत आहे. तसेच सौर प्लांट लावण्यासाठी देखील अनुदान देण्यात येत आहे. या सर्व गोष्टींचा मोठा फायदा हा बोरोसिल रिन्यूअल्सला झाला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कंपनीचा शेअर 36 रुपयांवरून तब्बल 671.45 रुपयांवर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांनी विचारही केला नसेल इतका चांगला परतावा त्यांना या कंपनीच्या माध्यमातून मिळाला आहे.

कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होतच आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत 557.50 रुपये इतकी होती. ती चालू महिन्यात वाढून 671.45 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच तीचे शेअर्स वीस टक्क्यांनी वधारले आहेत. गेल्या एका वर्षामध्ये कंपनीचे शेअर 165 रुपयांवरून 671.45 रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ त्यामध्ये 174 टक्क्यांची तेजी पहायला मिळाली आहे. बोरोसिल रिन्यूअल्सच्या शेअरची किंमत 7 एप्रिल 2020 रोजी 35.70 रुपये एवढी होती. तर सात एप्रिल 2022 म्हणजे आज या कंपनीच्या शेअरची किंमत 671.45 रुपये झाली आहे. याचाच अर्थ या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये 1,765 टक्के तेजी नोंदवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -