Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रसावधान! राज्यात पुन्हा उष्णतेची लाट; 'या' 12 जिल्ह्यांना अलर्ट

सावधान! राज्यात पुन्हा उष्णतेची लाट; ‘या’ 12 जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे.  29 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान राज्यात उष्णतेची पहिली लाट येऊन गेली. महिना होत नाही त्यातच आता पुन्हा राज्यात उष्णतेची लाट आली आहे. पुढील तीन दिवस ही लाट असणार आहे. कडक उन्हाळा असल्याने हवामान खात्याने राज्यातील 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यात रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangali), सातारा (Satara), अहमदनगर (Ahmednagar), जळगाव (Jalgaon), नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur), भंडारा (Bhandara), अकोला (Akola) आणि परभणी (Parbhani)  या जिल्ह्यांचा समावेश आहे.

मार्च महिन्याच्या शेवटी राज्यातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात उष्णता वाढली होती. यात जळगाव (Jalgaon), औरंगाबाद (Aurangabad), अहमदनगर (Ahmednagar), जालना (Jalna), परभणी (Parbhani) आदी जिल्ह्यात ही लाट अधिक प्रमाणात होती. त्यातच आता 12 जिल्ह्यांमध्ये पुन्हा पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट असणार आहे.

या जिल्ह्यांना देण्यात आला आहे यलो अलर्ट –
गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. त्यानुसार आजपासून पुढील 3 दिवस राज्यात उष्णतेची लाट असणार आहे. त्यानुसार हवामान विभागाने राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला आणि परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देत खबरदारी घेण्याचे सुचविले आहे. यासह प्रत्येक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने बचाव आणि उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. त्यानुसार संबंधित सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -