Thursday, February 6, 2025
Homeबिजनेसबिटकॉईन प्रकरणात आता ईडीची इंट्री, या प्रकरणाची घेतली माहिती

बिटकॉईन प्रकरणात आता ईडीची इंट्री, या प्रकरणाची घेतली माहिती

पुण्यातील बिटकॉईन या आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) फसवणूक प्रकरणात मदतीसाठी घेतलेल्या दोघा सायबर तज्ज्ञांनाच पुणे सायबर पोलिसांनी अटक केल्यानंतर आता या प्रकरणात अमंलबजावणी संचलनालयाने (ईडी) इंट्री घेतली आहे. या प्रकरणाविषयी या क्रेंद्रीय तपास यंत्रणेेने तपास अधिकार्‍यांकडून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. राज्यातील बिटकाईन तसेच इतर आभासी चलन प्रकरणातील फसवणुकीच्या बारा प्रकरणात ईडी तपास करत आहे. त्याच अनुषंगाने या प्रकरणात समांतर तपास सुरु केला असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

सायबर तज्ज्ञ पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड) आणि सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही सायबर तज्ज्ञ म्हणून पोलिसांना बिटकाईनच्या तपासात मदत करत होते. मात्र तपासात शासनाची फसवणूक करत संशयास्पद कृती केल्याचे चौकशीत आढळल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सायबर तज्ज्ञांनी आरोपींच्या वॉलेटमधून बिटकॉइन (क्रिप्टोकरन्सी) हे आभासी चलन परस्पर स्वत:च्या नातेवाईकांच्या नावावर वळविल्याच्या प्रकरणाचा ईडीने या प्रकरणात तपास सुरू केला आहे.



RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -