Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयक१८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार आता खासगी रुग्णालयात कोरोनाचा बुस्टर डोस

१८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार आता खासगी रुग्णालयात कोरोनाचा बुस्टर डोस

देशातील कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय असा की, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना आता रविवार म्हणजेच १० एप्रिलपासून खासगी लसीकरण केंद्रावर कोरोनाचा तिसरा डोस अर्थाच बुस्टर डोस (Booster dose) दिला जाणार आहे.

जर कोणी व्यक्ती कोरोनाचा बुस्टर डोस घेऊ इच्छित असेल तर, त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन तिसरा डोस घेऊ शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे सर्व नागरिक हा बुस्टर डोस घेऊ शकतात. असं असलं तरी बुस्टर डोस (Booster dose) घेणं अनिवार्य नाही. ते पुर्णपणे एच्छिक आहे. ज्या नागरिकांना बुस्टर डोस महत्वाचा वाटतो, ते नागरिक तिसरा डोस घेऊ शकतात.

देशात गेल्या दोन दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. गुरूवारी दिवसभरात १ हजार १०९ रुग्णांची भर पडली. तर, ४३ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान १ हजार २१३ रुग्णांनी कोरोनावर मात मिळली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६ टक्के, तर दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.२४ टक्के नोंदवण्यात आला. देशातील ४ कोटी २५ लाख २ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. तर, ५ लाख २१ हजार ५७३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात सध्या ११ हजार ४९२ (०.०३ टक्के) सक्रिय कोरोनाबाधित शिल्लक आहेत.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८५ कोटी ३८ लाख ८८ हजार ६६३ कोरोना डोस लावण्यात आले आहेत. ८३.६६ कोटी नागरिकांना दुसरा डोस देण्यात आले आहेत. तर, ९९.३६ कोटी नागरिकांना पहिला डोस लावण्यात आला आहे. खबरदारी म्हणून २.२७ कोटींहून अधिक आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान २.११ कोटी डोस १२ ते १४ वयोटातील मुलांना लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८७ कोटी ३ लाख ४५ हजार ९५ डोस पैकी १६ कोटी ३६ लाख ११ हजार ३१६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ७९ कोटी २९ लाख ६३ हजार ३३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ५३ हजार ५८२ तपासण्या गुरूवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -