Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रसासरचा जाच आणि 'लिव्ह-इन'मधील मित्राला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या

सासरचा जाच आणि ‘लिव्ह-इन’मधील मित्राला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाइन टीम

पती, सासू-सासरे आणि ‘लिव्ह-इन’मधील मित्रांच्या त्रासाला कंटाळून २७ वर्षीय विवाहित तरुणीने दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केला. याआधी तिने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तिला नागरिकांनी वाचविले. तसेच, घरी आणून सोडले होते.



सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मानसी भूपेंद्र यादव (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मित्र शिरीष नरेंद्र शहा (वय ३३, रा. मांजरी) याला अटक केली आहे. पती भूपेंद्र मुलायमसिंग यादव (वय ३०), सासरे मुलायम सिंग यादव (वय ५२) आणि सासू राजकुमारी मुलायमसिंग यादव (वय ५०) यांच्यावर चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



खराडी येथील ईनयांग या सोसायटीतील हा प्रकार
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी यादव हिचे भूपेंद्र यादव याच्यासोबत लग्न झाले होते. पती, सासू सासरे हे सर्व मध्य प्रदेशात राहतात. तर मानसी यादव ही उच्च शिक्षणासाठी खराडी येथील ईनयांग सोसायटीमध्ये राहत होती. तिची रियल इस्टेट एजंट असलेल्या शिरीष शहा याच्यासोबत ओळख झाली. ते दोघे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.दरम्यान, मागील काही दिवसांपासून पती आणि सासू सासरे तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करत होते. शिरीष देखील ती विवाहित असल्‍याचे माहीत असून लग्नासाठी सतत वाद घालत होता. तसेच तिच्याकडे पैशाचीही मागणी करत होता.

एकीकडे पती, सासू-सासरे आणि दुसरीकडे लिव्ह-इनमधील मित्र शिरीष यांच्या त्रासाला कंटाळून मानसीने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तिला नागरिकांनी वाचविले. तसेच, घरी आणून सोडले होते. त्यानंतर तिने दहा मजल्यावरून उडीमारून आत्महत्या केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -