Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला मिळणार बुलेट

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला मिळणार बुलेट

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेता पृथ्वीराज पाटील यांना श्री. छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघाकडून बुलेट दुचाकी सप्रेम भेट देण्यात येणार असल्याची माहिती तालीम संघाचे उपाध्यक्ष तथा माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनिल काटकर यांनी दिली.



कुस्तीमधील मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सातार्‍यात पार पडली. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील व मुंबईचा विशाल बनकर यांच्यात चुरशीचा अंतिम सामना झाला. या सामन्यात पृथ्वीराज पाटील याने बनकर याच्यावर पाच-चार ने मात करीत हा सामना जिंकला. श्री.छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघाकडून महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बुलेट देण्यात येणार आहे. ही बुलेट खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे सुनील काटकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -