ताजी बातमी ऑनलाईन टीम
गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी कर्तव्यनिष्ठ 33 कोटी रुपयांचा निधी पायाभूत सुविधा भक्कम केला आहे. चौफेर विकासासाठी शहराला पुन्हा देशात अव्वल करणार असून येत्या निवडणुकीत गडहिंग्लज पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्रपणे निवडणूक लढवून सत्ता मिळणार. पण नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असा निर्धार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना केला.
रविवारी गडहिंग्लज शहरातील भीमनगर परिसरात विविध विकास कामाचा लोकार्पण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रा. किसनराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे यांनी भीमनगर परिसरातील विविध विकास कामांची माहिती देत आगामी काळात प्रस्तावित कामांची माहिती दिली. गेल्या पाच वर्षात सत्ताधारयांकडून भीमनगरला विकास निधी दिला नाही. मंत्री मुश्रीफ आणि मागासवर्गीय वस्तीला मोठय़ा प्रमाणात निधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, गडहिंग्लज नगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असून काँग्रेस पक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार आणि बांधकाम कामगारांना मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, माजी नगरसेविका रेश्मा कांबळे, किरण कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी जि प सदस्य सतीश पाटील, उदयराव जोशी, सुरेश कोळकी, शर्मीली मालंडकर, संतोष कांबळे, राजशेखर दड्डी, सुनील चौगुले, उदय परीट, दीपक कुराडे, कावेरी चौगुले, शारदा आजरी, गुंडू पाटील, अमर मांगले, अवधूत रोटे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण म्हेत्री यांनी केले तर आभार शुभम बारामती यांनी मानले.
मी पुन्हा येणार म्हणणाऱ्यांची अवस्था काय ? आपले मनोगत करताना माजी नगरसेवक हरुण सय्यद म्हणाले, नगरपालिकेतील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. पण सत्ताधारयाकडून काही कर्मचाऱ्यांचे काम अडवून पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असे सांगून काम थांबवले आहे. पण पुन्हा मीच सत्तेत येणार म्हणणाऱ्यांची राज्यात आज काय अवस्था आहे ? हे सर्वांना माहीत असल्याचा टोला श्री. सय्यद यांनी लगावला.
गडहिंग्लज पालिका निवडणूक महाविकास आघाडी लढणार : मंत्री हसन मुश्रीफ
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -