जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध शाखेच्या पथकाने घरफोडीततील दोन आरोपींना अटक करून त्याचाकडून 30 हजार रु किंमतीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. प्रवीण हणमंत पवार वय 19, समीर हुसेन शेख वय 24 दोघे रा रामनगर जयंसिगपूर अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. या दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती जयंसिगपूर पोलिसांना दिली आहे.
17 मे रोजी रात्री 12: 30 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली होती. याबाबत सूरज राजेंद्र पाटील वय 27 व्यवसाय इंजिनिअर रा प्लॉट न 263 शाहूनगर नांदणी रोड जयंसिगपूर यांनी जयंसिगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घराचे स्लायडिंग अर्धवट उघड्या खिडकीतून आतमध्ये हात घालून चोरट्यांनी लॅपटॉप पळविला होता.