Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगगॅस कनेक्शन घेणं महागणार! उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाही बसणार फटका..

गॅस कनेक्शन घेणं महागणार! उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाही बसणार फटका..

देशात मागील काही दिवसांपासुन गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याचं आपण पाहिलं. आता गॅस कनेक्शनच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला नवीन घरगुती गॅस कनेक्शन (LPG Gas Cylinder Connection) घ्यायचं असेल तर जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. कारण पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅसच्या नव्या कनेक्शनच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि ही हिंदुस्थान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीनुसार..

▪️ गॅस कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना यापूर्वी नवे सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये मोजावे लागायचे. मात्र उद्यापासून म्हणजेच 16 जूनपासून नागरिकांना 750 रुपयांची वाढ झाल्याने 2200 रुपये द्यावे लागणार आहेत.

▪️ पेट्रोलियम कंपन्यांकडून 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरचं ग्राहकांनी नवीन कनेक्शन घेतल्यास प्रति सिलेंडर त्यांना 750 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

▪️ ग्राहकांनी जर दोन सिलिंडरचे कनेक्शन घेतले तर 1500 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. म्हणजेच, यासाठी एकूण 4400 रुपये सिक्युरिटी रक्कम म्हणून भरावी लागणार आहे. हे नवीन दर 16 जून 2022 पासून लागू होईल, अशी माहीती आहे.

रेग्युलेटरचे दरही वाढले: महत्वाचे म्हणजे रेग्युलेटरसाठी सुद्धा आता 150 रुपयांऐवजी 250 रुपये द्यावे लागतील. उद्या 16 जून पासून हे नवीन दर लागू होतील. पाच किलोच्या सिलेंडरच्या सुरक्षेसाठी 800 रुपयांऐवजी 1150 रुपये मोजावे लागतील, अशी माहिती पेट्रोलियम कंपन्यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाही नवे दर लागू झाल्याने फटका बसणार आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना पहिल्यांदा कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सुरक्षा रक्कम भरावी लागेल. परंतु जर त्यांना त्यांचे दुसरे कनेक्शन घायचे असल्यास म्हणजेच गॅस कनेक्शन डबल करायचं असेल तर दुसऱ्या सिलेंडरसाठी वाढलेली सिक्युरिटी रक्कम त्यांना भरावी लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -