सध्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघण्यापेक्षा कित्येकजण घरबसल्याच स्मार्ट टीव्ही, फोनच्या माध्यमातून नवनवीन चित्रपट पाहत असतात. नवनवीन चित्रपट हे काही दिवसांमध्येच लगेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतात, तर काही थेट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतात मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मचे रिचार्ज हे अत्यंत महागडे आहेत. महिन्याला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, झी5, डिज्नी+ हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी शेकडो रुपये आकारले जातात. तुम्हाला देखील नवीन चित्रपट, सिरीज पाहण्याची आवड असल्यास किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी जास्त पैसे खर्च करायचे नसल्यास काही टीप्स फॉलो करू शकता. याद्वारे तुम्ही एकही रुपया खर्च न करता नवनवीन चित्रपट फुकट पाहू शकता.
यासाठी तुम्हाला The Internet Archive या वेबसाईटबद्दल माहिती असायला हवी. या वेबसाईटवर लाखो पुस्तक, गाणी, चित्रपट, सॉफ्टवेअर, वेबसाइट व इतर गोष्टींचा संग्रह आहे. विशेष म्हणजे या गोष्टी ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. ही एक non-profit library आहे, ज्यामध्ये तुम्ही मोबाईल फोन किंवा अन्य डिव्हाइसच्या माध्यमातून अगदी सहज चित्रपट डाउनलोड करू शकता. तुम्ही फक्त बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडचे चित्रपट देखील डाउनलोड करू शकता. Hulu.com या वेबसाईटवर देखील तुम्ही मोफत चित्रपट पाहू शकता.
यासाठी तुम्हाला प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. पहिला महिना फ्री ट्रायल देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही मोफत चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. Public Domain Torrents या वेबसाईटवरून देखील तुम्ही अनेक लोकप्रिय चित्रपट डाउनलोड करू शकता. या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही मोबाइल डिव्हाइससह कॉम्प्युटरवर देखील मोफत चित्रपट डाउनलोड करू शकता.