Tuesday, August 26, 2025
Homeयोजनानोकरीअग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात; ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात; ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

भारतात सध्या अग्निपथ योजनेला कमालीचा विरोध वाढलेला आहे. कित्येक राज्यांमध्ये या योजनेच्या विरोधात निदर्शने सुरु आहेत. असं असलं तरी आता अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. हवाई दलातील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अग्निपथ योजनेतंर्गत भरतीसाठी दोन दिवसांत 56,960 जणांनी अर्ज केले होते आणि आता हा आकडा 2 लाखांच्या वर पोहोचला आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या भरतीची अर्ज प्रक्रिया 5 जुलै रोजी बंद होणार आहे. अग्निपथ योजनेतंर्गत हवाई दलात भरतीसाठी 24 जून 2022 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती.

‘अग्नीवर’ भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष पूर्ण करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारमार्फत 14 जून रोजी अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली होती. अग्निपथ योजनेअंतर्गत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी भरती केले जाईल. भरती झालेल्यांपैकी 25 टक्के अग्निवीरांना नियमित सेवेत दाखल केले जाणार आहे.

हवाई दलातील चार वर्षांच्या सेवेसाठी इच्छुक असलेल्या युवकांना careerindianairforce.cdac.in

या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतील. अग्निपथ योजनेच्या घोषणेननंतर देशभरात युवकांनी हिंसक आंदोलने केलेली आहे.

अग्निपथ योजना म्हणजे सैन्याचे कंत्राटीकरण असा आरोपही करण्यात येत आहे. चार वर्षाच्या सेवेनंतर युवकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल असा आक्षेप युवकांनी आणि विरोधी पक्षांनी या योजनेच्या विरोधात घेतला आहे. केंद्र सरकारने अग्निविरांना केंद्रीय निमलष्करी दलासह शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची घोषणा केली असली तरी त्याबद्दल शाश्वती नसल्यामुळे अग्निपथ योजनेला अजूनही विरोध सुरूच आहे. आता भरती प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -