Thursday, July 31, 2025
Homeराजकीय घडामोडी12 दिवसांच्या सुट्टीनंतर बंडखोर आमदार राज्यात परतले, आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

12 दिवसांच्या सुट्टीनंतर बंडखोर आमदार राज्यात परतले, आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिंदे सरकारच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीसाठी शिंदे सरकार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उद्या अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे, तर विरोधातील महाविकासआघाडीने शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना या विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. ठाकरे सरकार कोसळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 30 जून रोजी राज्याची सत्ता हाती घेतली आहे.



ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Sarkar) काँग्रेसने या पदावर दावा केला होता. मात्र आता विरोधात असलेल्या माहाविकास आघाडीतील तीन्ही मित्रपक्षांनी चर्चेनंतर ही जागा शिवसेनेच्या देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचा अर्ज आम्ही दाखल केला असून तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -