डॉ महेश कांबळे तसेच काँग्रेस आंदोलनकर्त्याना चोख प्रत्युत्तर पोलिसात तक्रार दाखल
औरंगाबादचे संभाजीनगर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण केल्याचे महाविकास आघाडीने घेतल्याचे जाहीर केल्यानंतर MIM जिल्हा अध्यक्ष डॉ महेश कांबळे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने या निर्णयाला पाठींबा दिल्याचा रोष व्यक्त करत राज्य मंत्री विश्वजित कदम यांच्या डिजिटल फलकला जोडे मारो आंदोलन केले होत.त्यावर मिरज तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन आंदोलन केले होते.या आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी डॉ महेश कांबळे यांच्यावर वैयक्तिक खालच्या पातळीवर टिका केल्याने त्यांना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा डॉ महेश कांबळे यांनी दिला आहे आज मिरज शहर पोलिसांत याची तक्रार डॉ महेश कांबळे यांनी दिली आहे.लवकरच या नेत्याच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश करून जनतेसमोर आणणार असा इशारा ही दिला आहे.