ताजी बातमी ऑनलाईन टीम
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली आहे. पण, शिवसेनेनं व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे ३९ सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी दिली. तर शिंदे गटाकड़न व्हीप जरी करण्यात आला होता. त्यांनीही १६ आमदारांनी व्हीप मोडला असल्याची तक्रार दिली आहे.
दरम्यान, शिवसेनेने (Shivsena) ३९ आमदारांविरोधात व्हिपचे पालन न केल्याने तक्रार दाखल केली आहे. तर शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या १६ आमदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेनं तातडीने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. तर शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिण्यात आले आहे. अध्यक्ष नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला. विधा। अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचं अधिवेशनादरम्यान वाचन केलं.
शिवसेनेकडून ३९, तर शिंदे गटाकडून १६ आमदारांविरोधात तक्रार; व्हीपविरोधात मतदान केल्याचा आरोप
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -