Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरपन्हाळगड ते पावनखिंड : इथे सांडले रक्त, देई तुम्हा आव्हान..!

पन्हाळगड ते पावनखिंड : इथे सांडले रक्त, देई तुम्हा आव्हान..!

कोल्हापूर :  12 व 13 जुलै 1660 या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड या सह्याद्री पर्वत रांगेतील मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. शिवछत्रपती व त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणार्थ अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मावळ्यांच्या जाज्वल्य पराक्रमी इतिहासाला अभिवादन करण्यासाठी आणि हा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध शिवभक्त-इतिहासप्रेमी संस्था- संघटनांच्या वतीने जुलै महिन्यात ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या साहसी पदभ-मंती मोहिमेचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे थांबलेल्या मोहिमा यंदा पर्ववत सरू होत असल्याने आबालवढांत उत्साहाचे वातावरण आहे.

शिवकालीन इतिहासाचा मागोवा
पन्हाळगडाला पडलेला सिद्दी जौहरचा वेढा शिताफीने फोडून शिवछत्रपती व त्यांच्या मावळ्यांनी रात्रीच्या अंधारात, धुंवाधार पावसात सह्यादीच्या डोंगर-कपारीच्या मार्गावरून वाऱ्याच्या वेगाने विशाळगडाकडे कूच केली. या मार्गावर चौकेवाडी (सध्याचे पांढरेपाणी) ते भाततळी या सुमारे 6 कि.मी. परिसरात शिवछत्रपतींच्या बांदलमराठा आणि सिद्दीच्या हजारोंच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. पावनखिंड पसिरात शत्रूला रोखून शिवछत्रपतींना सहीसलामत विशाळगडावर पोहोचविण्यात मावळ्यांना यश आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -