Monday, August 4, 2025
Homeयोजनानोकरीबँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदांसाठी होतेय बंपर भरती

बँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदांसाठी होतेय बंपर भरती

बँकेमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) बंपर भरती करण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या 300 हून अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहे. यासाठी अर्जाची प्रक्रिया 22 जून रोजी सुरु झाली असून भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 जुलैपर्यंत अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवारांना bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत 350 पदांची भरती केली जाणार आहे. कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिटची 100 पदं भरली जाणार आहेत. क्रेडिट विश्लेषकची 100 पदं, संबंध व्यवस्थापक 75 पदे, कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट 50 पदे असा रिक्त जागांचा तपशील आहे. संबंध व्यवस्थापकाच्या पदासाठी इच्छुक उमेदवाराचे पदवी शिक्षण पूर्ण झालेलं असणं अनिवार्य आहे.

क्रेडिट विश्लेषकाच्या पदासाठी इच्छुक उमेदवाराने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं असावं अशी अट आहे. कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट पदासाठी 69,180 रुपये, क्रेडिट विश्लेषक साठी 78,230 रुपये, संबंध व्यवस्थापकसाठी 89,890 रुपये, कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिटसाठी 78,230 रुपये पगार असं स्वरूप असणार आहे.

अर्ज करताना सुरुवातील अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. होमपेजवर Current Opportunities हा पर्याय निवडायचा आहे. नंतर उमेदवाराने स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2022 यासाठीच्या लिंकवर जाऊन समोर असलेल्या अर्जावर आवश्यक माहिती भरून ऑनलाईन भरायचा आहे. उमेदवारानं अर्जामध्ये योग्य तपशील भरल्यानंतर अर्ज जमा करुन अर्जाचे शुल्क भरावे. General आणि OBC/EWS उमेदवारांना 600 रुपये तर आरक्षित वर्गातील (ST/SC/PwD) उमेदवार आणि महिलांना 100 रुपये शुल्क उमेदवारांना भरावे लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -