गगनबावड्यापासून दोन कि.मी. अंतरावरील भुईबावडा घाटात धबधब्यावर अंघोळीसाठी उतरलेल्या रोशन यशवंत चव्हाण (वय 29, रा. कापडपेठ, मिरज, जि. सांगली) या पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
सांगली येथील दहाजण धनंजय बेलवलकर यांच्या वेसरफ येथील घरी आले होते. मंगळवारी भुईबावडा घाटात वाहणाऱ्या धबधब्यामध्ये ते अंघोळीसाठी उतरले होते. तेव्हा रोशन चव्हाण हा तरुण दरीत पडला. त्याची माहिती मित्रांनी गगनबावडा पोलिसांना दिली. वैभववाडी पोलिस हे घटनास्थळी आले. करूळ येथील सह्याद्री जीव रक्षक पथकाच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह दरीतून बाहेर काढला.