ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांसाठी मोठी दुःखद बातमी आहे. राजू श्रीवास्तव यांचं बुधवारी सकाळी निधन झालं. मागील 41 दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये (Delhi AIIMS) उपचार सुरू होती.
राजू श्रीवास्तव हे मागील 41 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांची जीवन-मृत्यू अशी झुंज सुरू होती. अखेर बुधवारी राजू श्रीवास्तव यांच्यावर मृत्यूने (Raju Srivastav Death) विजय मिळवला. एम्सच्या डॉक्टरांकडून राजू यांच्या प्रकृतीतत सुधारणा व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. पण ते त्यात अपयशी ठरले. राजू यांच्या निधनाची बातमी चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी आहे.
41 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते राजू
राजू श्रीवास्तव यांनी 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला. नंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीच्या सर्जरी देखील करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ते कोमात होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली होती. परंतु राजू यांनी बुधवारी सगळ्यांना अलविदा केलं.या घटनेमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडसह जगभरातील त्यांचे चाहते राजू यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.